‘महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा’ ज्युनिअर गट मुलींची फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा २०२५ !!
पुणे जिल्हा महिला संघाचा अंतिम फेरीत प्रवेश; विजेतेपदासाठी मुंबई संघाशी लढत !!

शिरपुर, धुळे येथील मुकेश पाटील शालेय मैदानावर झालेल्या उपांत्य फेरीच्या या सामन्यामध्ये पुणे जिल्हाने आक्रमक सुरूवात करून कोल्हापुर संघाच्या बचाव फळीवर दबाव निर्माण केला. जेनी राज हिने ९ व्या मिनिटाला गोल करून पुणे संघाचे खाते उघडले. त्यानंतर लगेचच अनुश्री देवलालीकर हिने गोल करून पुणे संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. २३ व्या मिनिटाला कर्णधार शर्वरी माने हिने गोल केला. त्यानंतर चारच मिनिटांनी दिवीशा मथपती हिने गोल करून संघाची आघाडी ४-० अशी वाढवली. पुर्वार्धात पुणे संघाकडे ४-० अशी आघाडी होती.
उत्तर्धातही पुणे संघाने सुरेख चाली रचून गोल नोंदविले. दिवीशा मथपती (४१ मिनिट) आणि शर्वरी माने (४५ मिनिट) यांनी गोल करून संघाची आघाडी ६-० अशी फुगवली. कोल्हापूर संघाला गोल करण्याच्या संधी मिळाल्या होत्या पण, त्याचे रूपांतर गोलामध्ये करण्यात खेळाडू अपयशी ठरले. मुंबई संघाने ठाणे जिल्हा संघाचा ६-० असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
सामन्याचा सविस्तर निकालः उपांत्य फेरीः
पुणे जिल्हाः ६ (जेनी राज ९ मि., अनुश्री देलालीकर १० मि., शर्वरी माने २३, ४५ मि., दिवीशा मथपती २७, ४१ मि.) वि.वि. कोल्हापुर संघः ०; पुर्वार्धः ४-०;
फोटो ओळीः पुणे जिल्हा संघ (निळा जर्सी) आणि कोल्हापुर संघ (नारंगी जर्सी) यांच्या सामन्यातील क्षण.
 
				 
					


