आदर्श तीर्थक्षेत्र आळंदी विकासासाठी उद्योजक सतिश चोरडिया नगराध्यक्ष पदा साठी निवडणुकीचे रिंगणात

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या तीर्थक्षेत्र आळंदीचे सर्वांगीण विकासासह वारकरी भाविक आणि नागरिकांना अधिक प्रभावी सेवा सुविधा देण्यासाठी येत्या आळंदी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे माध्यमातून समाजसेवेसाठी निवडणूक लढविणार असल्याचे उद्योजक सामाजिक कार्यकर्ते, आळंदी ग्रामीण रुग्णालय समितीचे सदस्य उद्योजक सतिश चोरडिया यांनी सांगितले.
येत्या नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी आपण इच्छुक असून त्यासाठी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागितली असल्याचे सांगत आपण आळंदीतील मतदार नागरिकांशी संवाद साधत आपली भूमिका मांडत असल्याचे त्यांनी सांगितले. आळंदीचे सर्वांगीण विकासासाठी आपल्या कडे व्हिजन असून नागरिक आणि भाविक यांना डोळ्यासमोर ठेवून तीर्थक्षेत्र आळंदी विविध समस्यां मुक्त करणार असल्याचे सांगितले. यात यांत्रिक साधने वापरून आळंदी शहर स्वच्छता साफ सफाई आणि कचरा मुक्त ठेवणार आहे. यासाठी आपण प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, आरोग्य विषयक सेवेत कार्यरत असून आळंदी पचनक्रोशीतील उद्योजक आहेत. आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे विकास कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. आळंदीचे विकासात या पूर्वी त्यांनी योगदान दिलेले आहे. स्वच्छ, नवतरुण चेहरा हि त्यांची जमेची बाजू आहे. त्यांचे व्यापारी उद्योजकीय कामकाजाची ते पंचक्रोशीत सर्व परिचित आहेत.
श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या नगरीला आत्याधुनिक सुविधां देणे यास प्राधान्य देण्याचे ध्येय आहे. स्वच्छ आळंदी, मुबलक पिण्याचे पाणी, नदी स्वच्छता, दर्जेदार नागरी सेवा सुविधा, सुरळीत वाहतूक व्यवस्था, आळंदीस पर्यटन स्थळ बनविण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांना बरोबर घेत पारदर्शक प्रशासकीय कामकाज, लोकसहभागातून विकास कामे मार्गी लावण्यास प्रयत्न करणे, लोकसंख्या पाहता त्या प्रमाणात सेवा सुविधा नियोजन विकास आराखडा तयार करून लोकाबहुमुख कारभार करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. आळंदीचे विकासात राजकारता पेक्षा समाज विकासास लक्ष देऊन विकास साधणार असे त्यांनी सांगितले. संत ज्ञानेश्वर महाराज यांचे श्रीक्षेत्र आळंदीचे विकास कामातून नावलौकिक वाढविण्यासाठी या पुढील काळात पाठपुरावा केला जाईल. या साठी नागरिकांना विश्वासात घेऊन निर्णय प्रक्रिया केली जाईल असे सांगत त्यांनी संवाद साधला. शहरातून नागरिकांच्या भेटी घेत असून यास खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.



