“समाजाचे” “समाजाला” देण्याने मानसिक समाधान – संदीप खर्डेकर.
क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विविध संस्थांना वस्तू भेट !!

पुणे.आपल्याला जी संपत्ती,पद, प्रतिष्ठा मिळते ती समाजामुळे त्यामुळे समाजाने दिलेले समाजातील वंचित आणि गरजुंना दिल्याने मानसिक समाधान लाभते असे मत क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले. आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने विविध संस्थांना 75 कॉफी मग,150 शाल, खेळणी व इतर उपयुक्त वस्तू भेट देण्यात आल्या त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर, दिव्यांगांसाठी 35 वर्षे काम करणाऱ्या सीमाताई दाबके,श्री. प्रतीक खर्डेकर,सौ. कल्याणी खर्डेकर,साई सेवा मतिमंद निवासी शाळा शिवणे चे श्री. संदीप फरगडे,ज्ञान गंगोत्री मतिमंद निवासी शाळा आंबेगाव चे श्री. राजू नाईकवाडी, श्री. संतोष पोकळे,एनॅब्लेर चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र घावटे, अशोक बोत्रे व इतर मान्यवर उपस्थित होते.
आपल्या संस्कृतीत दानाचे महत्व खूप मोठे आहे, विशेषतः काही शुभ प्रसंगी दान दिल्याने आपल्यात ही सकारात्मक बदल घडतात असेही संदीप खर्डेकर म्हणाले. दान हे केवळ संपत्तीचे नसून अन्न, वस्त्र, सेवा, ज्ञान, वेळ, उपयुक्त वस्तू असे विविध स्वरूपात केल्याने आपल्या शास्त्रानुसार द्रव्यशुद्धी होते आणि संपत्ती अक्षय राहते त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी दाना साठी पुढे यावे व गरजुंना मदतीचा हात द्यावा असेही संदीप खर्डेकर म्हणाले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन चे कार्य गरजुंपर्यंत पोहोचणे गरजेचे असून ज्या संस्थांना अश्या मदतीची गरज आहे त्यांच्यात आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन मध्ये समन्वय साधण्याचे काम मी आनंदाने करेन असे सीमाताई दाबके म्हणाल्या. मी लायन्स क्लब च्या माध्यमातून 9 नोव्हेंबर रोजी न्यू इंग्लिश स्कुल टिळक रस्ता, येथे दिव्यांगांच्या सर्व संस्थांचे एकत्रिकरण आयोजित केले असल्याचे व त्यात 50 संस्था सहभागी होणार असल्याचे ही सीमाताई म्हणाल्या.
क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून आम्ही करत असलेले कार्य हे समाजसेवेचा एक छोटासा प्रयत्न असून यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकराने त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला,तर याच दिवशी शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव जी यांची जयंती ही साजरी केली जाते त्यामुळे ह्या दिवसाचे विशेष महत्त्व असल्याचे ही सौ. मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. क्रिएटिव्ह फाउंडेशन चे हे कार्य अखंड सुरु राहणार असल्याचे वचन खर्डेकर कुटुंबियांनी दिले असून यात खंड पडू नये अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो असे संदीप खर्डेकर म्हणाले.



