“महा-भ्रष्ट युती”त भ्रष्टाचाराची स्पर्धा..!
राज्यकर्ते भ्रष्टाचारी झाल्याने, प्रशासनावर नैतिक धाक नाही.! काँग्रेस’ची टीका

पुणे दि ७ नोव्हें – पार्थ अजितदादा पवार यांच्या अमेडा कंपनीस ‘महार वतनाची सु २००० कोटींची जमीन’ मात्र २८५ कोटींना (सरकारी स्टॅम्प ड्युटी माफ करून) देण्याचा भ्रष्टाचार उघडकीस आल्याने, तहसीलदार – उपनिबंधकांना निलंबित करून वा नजरचुकीची कारणे सांगून कारवाई ची नौटंकी ही धूळफेक आहे.
वास्तविक ‘तहसीलदार यांच्या निलंबनाचा प्रस्ताव’ (२० आर्क्टो सु २० दिवसांपूर्वी) होता.. तर तेंव्हा पासुन मुख्यमंत्री यांनी या प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न का केला (?) असा सवाल काँग्रेस ने केला
तसेच मंत्र्यांच्या बंगल्यांचे नुतनीकरणाच्या नांवे देखील कोट्यवधींची लूट होत असल्याचे प्रकरण ही समोर आले आहे. एकीकडे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देण्यास सरकारकडे पैसे नसल्याने, कष्टकरी, सामाजिक संस्था व सामान्य नागरिक शेतकऱ्यांना धान्य व पैशांची मदत करण्यास पुढे येत असतांना… दुसरीकडे मात्र खोट्या नूतनीकरणाच्या नांवे ‘न केलेल्या कामाची कोट्यवधींची बिले’ सरकार काढत असून, आप्तेष्टांना जमीनीचे वाटप करीत, कोट्यवधींची स्टँम्प ड्युटी माफ करून, ‘महसूली ऊत्पन्न’ बुडवण्याचे प्रकार राज्यातील महा भ्रष्ट युती सरकार करत असल्याची प्रखर टीका राज्य काँग्रेस चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, राज्यकर्त्यांच्या दबावाखाली, भ्रष्टाचारी, अवैध व बेकायदेशीर मार्गाने ‘महाराष्ट्राच्या साधन संपत्तीचे’ लचके तोडण्याचे काम ‘महा-भ्रष्ट युती’ सरकार करत असल्याचे पुढे येत असुन
राज्यकर्ते भ्रष्टाचारी झाल्याने, प्रशासनावर नैतिक धाक नाही त्यामुळे प्रशासकीय कर्तव्यास तिलांजली देत ‘वरच्या कमाई’ला अनेक अधिकाऱ्यांचे प्राघान्य असल्याचे प्रत्ययास येते.. मात्र आजही प्रामाणिक अधिकारी प्रशासनात असल्याचे सांगितले.
मात्र डोक्यावरून पाणी जाऊ लागल्याने, कायदा – सुव्यवस्थेचा बोजा ऊडाल्याने.. हे सरकार बरखास्त होणेच् जनतेच्या हिताचे ठरेल. केंद्रीय नेतृत्वाकडे काही नैतिकता असेल तर सरकार बरखास्त करावे अन्यथा
“महायुती सरकार बरखास्त न केल्यास सदरचा भ्रष्टाचार केंद्रीय नेतृत्वाच्या आशिर्वादाने होत असल्याचेच्” सिध्द होते.
कॅसिनो मध्ये एका रात्रीत कोट्यवधी रुपये उधळलेल्या ना. चंद्रकांत बावनकुळे यांचे कडे महसुल मंत्री विभाग असेल तर दुसरे काय अपेक्षित असल्याची टीका ही प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली..!
भाजप’ शीर्ष नेतृत्वाने ज्यांच्यावर वारंवार ‘भ्रष्टाचाराचे जाहीर आरोप’ केले व पुनश्च त्यांना ‘लाल कार्पेट टाकुन “सत्तेचे दरवाजे” उघडून दिले.. त्यांनी प्रथम स्वतःची ‘नैतिक जबाबदारी’ स्वीकारून, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची खरी गरज आहे.
महार वतन जमीन शासकीय नजराणा व स्टँम्प ड्युटी न भरता कवडीमोल दरात घेतलेल्या प्रकरणाची “न्यायालयीन चौकशी” व्हावी अशी मागणी देखील काँग्रेसचे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
भाजप नेतृत्वास भ्रष्टाचाऱ्यांची मोट बांधण्याची अत्यंत हौस व छंद असुन, विविध राज्यात भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्यांनाच् सत्तेत बसवुन, त्यांचेच हस्ते राज्याची लुट करून ‘लोकशाही, संविधानीक व स्वायत्त संस्था’ खच्ची करण्याचे कारस्थान भाजप शीर्ष नेतृत्वाच्या आशिर्वादाने होत असल्याचे उघड होत असल्याची टिका ही काँग्रोस तर्फे करण्यात आली.
प्रसिद्धी सहाय्यक – प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी संपर्क कार्यालय, अक्षय श्री सोसा, २१६ नारायण पेठ, केळकर रस्ता, पुणे ३०



