मराठी
“एआय चा वापर माहिती मिळवण्या पुरता करा,वापर मात्र स्वतःच्या मेंदूचाच करा”- अनंत काशीबटला.

पुणे (दि.२१) “ए आय चा वापर माहिती मिळविणे,वेळ वाचवणे इतकाच करा,मात्र त्यावर प्रक्रिया ही आपला मेंदूचाच वापर करून करा,आपण फार एआयच्या आहारी जावून त्यावर अवलंबून राहतो,आपली स्वतःची विचार करण्याची,स्मरण करण्याची क्षमता विसरत चाललो आहे.जागेपाणाने वापर करा” असे प्रतिपादन अनंत काशीबटला यांनी केले. “बिल्डींग अ बेटर यु इन द एरा ऑफ ए आय” या विषयावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.अमित गार्डन येथे संपन्न झालेल्या या व्याख्यान प्रसंगी अनंत काशीबटला,हिमांगी जोशी आदी मान्यवरांच्या बरोबरच उद्योजक व विद्यार्थी उपस्थित होते.हेच व्याख्यान रविवार दिनांक २८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता ऑनलाइन होणार आहे. https//tinyurl.com/bby28dec



