‘एसके करंडक’ १३ वर्षाखालील आंतरक्लब टेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा !!
स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लब, योगेश इलेव्हन, पुणे पोलिस बॉईज संघांची विजयी कामगिरी !!

सातारा रोडवरील टेंभेकर फार्म्स क्रिकेट ॲकॅडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लब संघाने नहाटा क्रिकेट ॲकॅडमी आणि पुणे पोलिस बॉईज या दोन संघांचा पराभव करून सलग दोन विजयांची नोंद केली. अनुज खराडे याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लब संघाने नहाटा क्रिकेट ॲकॅडमीचा ६ गडी राखून पराभव केला. अमर कामत याने केलेल्या ७१ धावांच्या जोरावर दुसऱ्या सामन्यात स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लब संघाने पुणे पोलिस बॉईज संघाचा ६ गडी राखून पराभव केला.
अर्णव घाटे याने फटकावलेल्या शतकी खेळीच्या जोरावर योगेश क्रिकेट ॲकॅडमीने स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिक संघाचा ३३ धावांनी सहज पराभव केला. सार्थक ढेंगळे याने केलेल्या अष्टपैलु खेळीमुळे पुणे पोलिस बॉईज संघाने नहाटा क्रिकेट ॲकॅडमीचा ६ धावांनी निसटता पराभव करून आगेकूच केली.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
नहाटा क्रिकेट ॲकॅडमीः २० षटकात ६ गडी बाद १३९ धावा (समर्थ पोकळे ७७ (५५, १४ चौकार), श्राव्य भावसार २३, अनुज खराडे ३-२८) पराभूत वि. स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लबः १८.५ षटकात ४ गडी बाद १४२ धावा (मोहम्मद अर्स्लान ५० (५५, ७ चौकार), इशान माळी नाबाद ४८ (३३, ९ चौकार), अरविंद चौधरी १-१३); सामनावीरः अनुज खराडे;
योगेश क्रिकेट ॲकॅडमीः २० षटकात ४ गडी बाद २०६ धावा (अर्णव घाटे १०० (४७, १९ चौकार), श्रेय पडाळकर ४३, अव्दिका जाधव ३६, युवराज उभे १-२१) वि.वि. स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिकः २० षटकात ८ गडी बाद १७३ धावा (अन्वय पाटील ४४, अविष्कार पाटोळे २३, इशान जाधव २३, पुष्कर अंकलकोटे नाबाद १७, साई जोंधळे २-२६); सामनावीरः अर्णव घाटे;
पुणे पोलिस बॉईजः २० षटकात ८ गडी बाद ९५ धावा (अंश केळकर नाबाद ४३, अनुज खराडे २-१७, आदेश राऊत २-२०) पराभूत वि. स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लबः ८.५ षटकात ४ गडी बाद ९८ धावा (अमर कामत ७१ (३०, १६ चौकार), विहान सुर्यवंशी नाबाद ११, समर्थ कदम २-३०); सामनावीरः अमर कामत;
पुणे पोलिस बॉईजः २० षटकात ८ गडी बाद १४२ धावा (वेंदात मावस्कर ३०, अंश केळकर २०, सार्थक ढेंगळे नाबाद १७, सार्थक रवाळेकर २-२४) वि.वि. नहाटा क्रिकेट ॲकॅडमीः २० षटकात ८ गडी बाद १३६ धावा (स्वरूप जगाडे ३१, सार्थक रवाळेकर १९, सार्थक ढेंगळे २-११); सामनावीरः सार्थक ढेंगळे.



