माऊली मंदिरातून हैबतरावबाबा दिंडीचे त्र्यंबकेश्वर पायी वारी सोहळ्यास प्रस्थान

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : त्र्यंबकेश्वर पायी वारी दिंडी सोहळ्यास संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे जनक श्री गुरू हैबतरावबाबा यांची विना दिंडीने त्र्यंबकेश्वर पायी वारीस माऊली मंदिरातून हरिनाम गजरात प्रस्थान ठेवले. श्रीगुरु हैबतरावबाबा पायी दिंडी सोहळा सद्गुरू संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ ज्येष्ठ बंधू भेट सोहळा त्र्यंबक पायी वारी त्र्यंबकेश्वर साठी आळंदी मंदिरातून दिंडी मंदिर प्रदक्षिणा, विना पूजन, श्रींची आरती घेत हरिनाम गजरात मार्गस्थ झाली. या निमित्त माऊलींचे मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत मानाचा वीणा पालखी सोहळा मालक ऋषिकेश आरफळकर पवार यांनी विणेकरी जनार्दन ढाकणे महाराज यांचे कडे हरिनाम गजरात सुपूर्द केला.

यावेळी विना मंडपात प्रथा परंपरेने मालक ऋषिकेश आरफळकर पवार, विणेकरी जनार्दन महाराज यांनी सर्व दिंडीतील वारकऱ्या समवेत पंचपदी केली. या वेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान तर्फे उपव्यवस्थापक तुकाराम माने सरकार यांचे हस्ते विना पूजन झाले. या वेळी आळंदी जनहित फाउंडेशनचे विश्वस्त स्वामी सुभाष महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. श्रींचे दर्शन, मानकरी यांना श्रीफळ देऊन दिंडीने हरिनाम गजरात माउली मंदिरातून महाद्वार मार्गे नगरप्रदक्षिणा करीत त्र्यम्बक वारीस प्रस्थान ठेवले. अभंग, आरती झाली. हैबतरावबाबा यांचे सेवेकरी, पुजारी संभाजी महाराज यांनी माऊलींची आरती करून दिंडी त्र्यंबकेश्वर कडे मार्गस्थ झाली. या प्रसंगी तुकाराम माने सरकार, स्वामी सुभाष महाराज, शाम कोळपकर, माऊली गुळुंजकर, हैबतरावबाबा दिंडीतील मानकरी, मान्यवर यांचे उपस्थितीत दिंडी श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे सोहळ्यास त्र्यंबक वारीला हरिनाम गजरात मार्गस्त करण्यात आली. पहिला मुक्काम कोहिनकर वाडी येथे होत आहे.


