सदानंद शेट्टी आणि सुजाता शेट्टी यांनी मतदारांशी साधला थेट संवाद

प्रभाग क्रमांक २४ (ब) चे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सुजाता सदानंद शेट्टी आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष श्री सदानंद कृष्णा शेट्टी यांनी मतदारांशी साधला थेट संवाद मंगळवार पेठ शिवाजी स्टेडियम पासून प्रचाराला सुरुवात सुरुवात करत 228 मंगलवार पेठ, 220 मंगलवार पेठ, शाहीर अमर शेख रामायण मित्र मंडळ, वजन काटा, मरियम नगर, सिद्धार्थ नगर, कॉलनी नंबर 2, श्रमिक नगर, इंदिरानगर आदी परिसरामध्ये नागरिकांशी भेट देत प्रचार फेरी संपन्न झाला. या प्रचारादरम्यान परिसरातील लोकांशी संवाद साधला. हे परिसर सदानंद शेट्टी यांचा जुना वॉर्ड असून तिथं त्यांनी गेले 40 वर्ष कार्यरत आहेत. एक प्रकारे तो संपूर्ण परिसर त्यांचा बालेकिल्ला म्हणून जाणला जातो. येथील प्रत्येक घराघरातील महिलांनी सुजाता शेट्टी आणि सदानंद शेट्टींचे औक्षण करून जल्लोषात स्वागत केले. संपूर्ण परिसरामध्ये जल्लोषाचे वातावरण झाले होते. शेट्टी ह्यांनी उभारलेले भारतातील एक नंबर मानलेले SRA सदा-आनंद नगर सारखे सदरचे परिसर देखील झोपडपट्टी मुक्त करून तेथील नागरिकांना उत्तम घरे देण्याची आश्वासन दिले. नागरिकांनी देखील शेट्टी दाम्पत्यांचे कौतुक केले.



