ब्रेकिंग न्यूज़मराठीमहाराष्ट्रशहर

आगामी उत्सव कालावधीत १५ दिवस ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास मर्यादा शिथील

Spread the love

पुणे, दि. १२ : जिल्ह्यासाठी सन २०२६ मधील केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम २०१७ च्या नियम ५ उपनियम (३) अन्वये १५ दिवसांसाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाच्या वापरासाठी सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत वापर करण्यासाठी परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत.

शिवजयंती १९ फेब्रुवारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल, महाराष्ट्र दिन १ मे, गणपती उत्सव , ईद ए मिलाद व अनंत चतुर्दशीकरिता १९, २०, २२, २३, २४ व २५ सप्टेंबरपर्यंत ६ दिवस, नवरात्री उत्सव १९ व २० ऑॅक्टोबर, ख्रिसमस (नाताळ) २५ डिसेंबर व वर्षाअखेर ३१ डिसेंबर तसेच महत्वाच्या कार्यक्रमासाठी २ दिवस राखीव ठेवण्यात आले असून आवश्यकेतनुसार परवानगी दिली जाईल, असे आदेशात नमुद आहे.

उत्सवाच्या दिवशी ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास मर्यादा शिथील करुन पुढील अटींवर परवानगी देण्यात येईल. झोनींगप्रमाणे ठरलेल्या मयादेपेक्षा जास्त आवाज ठेवू नये. ही सूट शांतता क्षेत्रात लागू नसल्याने त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित सर्व यंत्रणांची राहील, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे. नियमांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन श्री. डुडी यांनी आदेशान्वये केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!