खेलब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

सातव्या ‘सिंधी प्रीमिअर लीग’ला १० एप्रिलपासून सुरुवात

सामाजिक एकोप्याच्या भावनेतून आयोजन; सातव्या हंगामात १६ पुरुष, सात महिला संघ खेळणार

Spread the love
पिंपरी (पुणे) : सामाजिक एकोप्याच्या भावनेतून आयोजित सिंधी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेच्या सातव्या हंगामाला १० एप्रिल २०२६ पासून सुरुवात होणार आहे. यंदा या स्पर्धेत १६ पुरुष, तर सात महिला संघ सहभागी होणार आहेत. पिंपरी येथील एमसीसी, मृणाल क्रिकेट ग्राउंडवर ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती संयोजन समितीचे नरेश नशा व बिपीन दखनेजा यांनी दिली.
नरेश नशा म्हणाले, “या ‘सिंधी प्रीमिअर लीग सीजन-७’चे उद्घाटन १० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. यावेळी माजी क्रिकेटपटू, सिंधी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, तसेच खेळाडू, संघ मालक व कुटुंबीयांची उपस्थिती असणार आहे. सिंधी समाजातील उद्योजक तरुणांनी एकत्र येऊन गेल्या सात वर्षांपासून या क्रिकेट लीगचे आयोजन केले आहे. स्पर्धेतून उभारलेल्या निधीचा समाजासाठी उपयोग होत आहे. यंदा या स्पर्धेतून उभा राहणाऱ्या निधीतून साधू वासवानी मिशन येथील एका विद्यार्थिनीचे संपूर्ण पालकत्व स्वीकारले जाणार आहे.
बिपीन दखनेजा म्हणाले, “आयपीएलच्या धर्तीवर या स्पर्धेची रचना करण्यात आली आहे. पुरुषांचे १६ संघमालक व महिलांचे सात संघमालक आपल्या २३ संघांसह स्पर्धेत उतरणार आहेत. पुरुष संघांची नवे सिंधी संस्कृतीवर आधारित, तर महिला संघांची नावे नद्यांवर आधारित आहेत. महिलांमध्ये ९८, तर पुरुषांमध्ये २५६ खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.”
——————————————-
असे आहेत १६ पुरुष, ७ महिला संघ
या स्पर्धेतील पुरुष गटामध्ये मस्त कलंदर (गीता बिल्डर्स, मयूर तिलवानी), सुलतान ऑफ सिंध (एए प्रमोटर्स अँड बिल्डर्स, हिरानंद आसवानी), मोहेंजोदरो वॉरियर्स (मिलेनियम डेव्हलपर्स, हरीश अभिचंदानी), सिंधफूल रेंजर्स (जीएस असोसिएट्स, जितू पहलानी), एसएसडी फाल्कन (विक्रम रोहेडा फोटोग्राफी, विक्रम रोहेडा), इंडस डायनामॉस (साईबाबा सेल्स, रोहन गेहानी), दादा वासवानीज ब्रिगेड (आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्स, श्रीचंद आसवानी), झुलेलाल सुपरकिंग्ज (गोगिया ग्रुप, सनी गोगिया), हेमू कलानी ग्लॅडिएटर्स (ट्रिओ ग्रुप, कमलेश पमनानी), गुरुनानक नाइट्स (पीव्हीआर टाईल्स वर्ल्ड, प्रकाश रामनानी), संत कंवरम रॉयल्स (विजयराज असोसिएट्स, क्रिश लाडकानी), आर्यन्स युनायटेड (आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्स, अनिल आसवानी), जय बाबा स्ट्रायकर्स (सुखवानी असोसिएट्स, सागर सुखवानी), सिंधी इंडियन्स (मनसुखवानी असोसिएट्स, मनीष मनसुखवानी), अजराक सुपरजायंट्स (लाइफक्राफ्ट रियल्टी, हितेश दादलानी) व पिंपरी योद्धाज (कुणाल कम्युनिकेशन्स, कुणाल लखानी) अशी या संघांची नावे आहेत. महिलांच्या संघात गंगा वॉरियर्स (दीक्षा खुबचंदानी, दीपक खुबचंदानी), गोदावरी जायंट्स (प्रेरणा गौरव रामचंदानी, जया प्रकाश रामचंदानी), झेलम क्वीन्स (शिखा व रॉकी सेवानी), सिंधू स्टारलेट्स (मनीषा अँड बिपीन दखनेजा), यमुना स्ट्रायकर्स (रिया व पवन कोटवानी), नर्मदा टायटन्स (रेशम वाधवानी व सपना मेलवानी), कृष्णा सुपरनोव्हाज (युवीना गेरेजा अँड मनीष गेरेजा) यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!