ब्रेकिंग न्यूज़मराठी

देशभरात सहावे स्थान मिळवून ‘डीपीयू’ने राष्ट्रीय स्तरावर उमटवला ठसा; संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये घवघवीत यश!

Spread the love

पिंपरी, पुणे: शिक्षण आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने (अभिमत विद्यापीठ) प्रतिष्ठित अशा ‘टाइम्स हायर एज्युकेशन सस्टेनेबिलिटी इम्पॅक्ट रँकिंग २०२६’ (Times Higher Education Sustainability Impact Ratings 2026) मध्ये ८३.९ च्या उत्कृष्ट एकूण गुणांसह (Overall Score) देशात ६ वे आणि जागतिक स्तरावर १०१ ते २०० च्या श्रेणीत स्थान मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

 

संयुक्त राष्ट्रांच्या (UN) शाश्वत विकास उद्दिष्टांची (SDGs) पूर्तता करण्याच्या निकषांवर हे जागतिक मानांकन जाहीर केले जाते. यामध्ये विद्यापीठाने आरोग्य, शून्य उपासमार आणि पाणी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

शाश्वत विकास उद्दिष्टांमधील (SDG) महत्त्वपूर्ण कामगिरी:

• SDG 3 – उत्तम आरोग्य आणि कल्याण (Good Health and Well-Being): वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत विद्यापीठाला देशात ४ था आणि जागतिक स्तरावर ३४ वा अत्यंत मानाचा क्रमांक मिळाला आहे. गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा आणि वैद्यकीय संशोधनातील विद्यापीठाचे हे यश उल्लेखनीय आहे.

• SDG 2 – शून्य उपासमार (Zero Hunger): कुपोषण निर्मूलन, अन्न सुरक्षा आणि अन्न बचतीच्या प्रयत्नांमध्ये विद्यापीठाने देशात ७ वे तर जगात ५२ वे स्थान पटकावले आहे.

• SDG 6 – स्वच्छ पाणी आणि स्वच्छता (Clean Water and Sanitation): पाणी संवर्धन आणि स्वच्छतेच्या बाबतीत विद्यापीठाने देशात ११ व्या स्थानावर, तर जागतिक स्तरावर १०१ ते २०० च्या श्रेणीत बाजी मारली आहे.

 

डॉ. पी. डी. पाटील (कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे): म्हणाले “टाइम्स हायर एज्युकेशनच्या जागतिक क्रमवारीत मिळालेले हे यश आमच्या संपूर्ण विद्यापीठ परिवाराच्या कठोर परिश्रमांचे आणि दूरदृष्टीचे फलित आहे. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच जागतिक शाश्वत विकासासाठी (Sustainability) योगदान देणे हे आमचे कर्तव्य आहे. हे मानांकन सामाजिक कल्याणासाठी कटिबद्ध राहण्याची आमची प्रेरणा अधिक दृढ करते.”

 

सौ. डॉ. भाग्यश्रीताई पी. पाटील (प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे): म्हणाल्या “आरोग्य, पाणी व्यवस्थापन आणि शून्य उपासमार सारख्या महत्त्वपूर्ण जागतिक उद्दिष्टांमध्ये जगातील सर्वोत्तम संस्थांमध्ये स्थान मिळवणे ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. हे यश आंतरराष्ट्रीय स्तरावर आमचा शैक्षणिक आणि सामाजिक दर्जा सिद्ध करते.

 

हा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक टप्पा डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे चे कुलपती डॉ. पी. डी. पाटील आणि प्र-कुलपती सौ. डॉ. भाग्यश्रीताई पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व अखंड पाठबळामुळे साध्य झाला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांचे मार्गदर्शन, प्र-कुलगुरू डॉ. स्मिता जाधव यांचे गतिमान व कुशल नेतृत्व, तसेच डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणे चे विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पी. पाटील यांच्या निरंतर प्रोत्साहनामुळे आणि पाठिंब्यामुळे या यशाला अधिक बळ मिळाले आहे. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व, धोरणात्मक दिशा आणि शैक्षणिक उत्कृष्टता, संशोधन, नाविन्यता (इनोव्हेशन) व शाश्वत विकासाप्रती असलेली दृढ कटिबद्धता; यांमुळेच जगातील अग्रगण्य विद्यापीठांमध्ये ‘डीपीयू’चे (DPU) स्थान मजबूत करण्यात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!