ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

हातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकार

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचे प्रतिपादन; ‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’च्या दालनाचे उद्घाटन

Spread the love
पुणे: “भारताच्या विविध भागात वेगवेगळ्या प्रकारचे कापड प्रसिद्ध आहे. स्थानिक कारागिरांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आणि भारतीय हातमाग उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये राष्ट्रीय हातमाग दिन, ‘एमएसएमई’ योजना, कारागिरांसाठी कर्जसुविधा आणि पारंपरिक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत,” असे प्रतिपादन संसदीय समितीच्या अध्यक्षा व राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले.
‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’ या येवला पैठणीच्या अग्रगण्य ब्रँडच्या पुण्यातील भव्य दालनाचे उद्घाटन मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. ठाण्यानंतर ‘निरुपाज्’ने आता पुण्यात मध्यवर्ती भागात भांडारकर रस्त्यावर शानदार दालन सुरू केले आहे. उद्घाटनावेळी निरुपाज्’च्या संस्थापिका निरुपा तायडे, त्यांच्या मातोश्री वंदना वझारे, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, ईशम तायडे, दिलीप खैरे, धिरज वझारे, गणेश डोके, महेश गायकवाड, योगिता गायकवाड, तुषार खैरे, सारंग मगर, वैशाली डोके, रोहित डोके आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “साडी हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तसेच भारतात साड्यांचा व्यवसाय मोठा असून, साड्या विणणे ही एक कला आहे. या कलेला प्रोत्साहन देण्याचे काम केंद्र सरकार सातत्याने करत आहे. पुण्यातील महिला चोखंदळ आहेत. त्यांना साड्यांची चांगली पारख आहे. ‘निरुपाज्’च्या साड्या या स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन देऊन तयार करण्यात आल्या आहेत, ही कौतुकाची बाब आहे. येत्या काळात रेल्वेस्थानकांवर वस्त्रदालने, स्थानिक हस्तकला उत्पादने यांना विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न सुरू आहे. या उपक्रमांमुळे पारंपरिक कला आणि व्यवसायांचे जतन होण्याबरोबरच ते पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.”

निरुपा तायडे म्हणाल्या, “या दालनात ग्राहकांना येवल्याची अस्सल पैठणी आणि सिल्कच्या विविध प्रकारच्या साड्यांचे कलेक्शन पाहता आणि खरेदी करता येणार आहे. निरुपाज् साडीचे पुण्यातील हे पहिलेवहिले दालन असून, याठिकाणी दोन हजारांपासून सात लाख रुपयांपर्यंतच्या अस्सल हातमाग साड्या उपलब्ध आहेत. पारंपरिक येवला पैठणी, बनारसी, सिल्क, पटोला अशा पारंपरिक साड्यांबरोबरच जरदोसी वर्क, मोती वर्क केलेल्या नव्या पद्धतीच्या साड्यांचेही उत्तम कलेक्शन पाहता येणार आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी ‘निरुपाज्’ची ब्रँड अँबेसेडर असून, नुकतीच कान्स चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर प्राजक्ताने ‘निरुपाज्’ची साडी परिधान केली होती. याशिवाय केतकी माटेगावकर, अभिजित खांडकेकर यांसारख्या बऱ्याच सेलिब्रिटींनी येथून साडी खरेदीला पसंती दिलेली आहे. त्यामुळे सेलिब्रिटींमध्येही ‘निरुपाज्‘ विशेष प्रसिद्ध आहे.
प्रत्येक साडीचा पोत, फिनिशिंग याकडे विशेष लक्ष दिलेले असल्याने येथील साड्या वेगळ्या आहेत. अस्सल हातमागावर विणलेल्या आणि हाताने कारागिरी केलेल्या या साड्या आपण कारागिरांकडून तयार करुन घेतल्या आहेत. मराठमोळ्या साड्यांची समृद्ध परंपरा जपणारे ‘निरुपाज् सारीज’ ठाणे आणि मुंबईत तर प्रसिद्ध आहेच. पण आता पुण्यातही नव्याने ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने हे दालन महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. येत्या ७ दिवसांत जे ग्राहक दालनात येऊन साडी खरेदी करतील त्यांना साड्यांवर विशेष सूट देणार असल्याचे निरुपा तायडे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!