धर्मब्रेकिंग न्यूज़मराठीमहाराष्ट्र

आळंदीत इंदिरा एकादशी दिनी भाविकांची दर्शनास गर्दी

श्रींचे गाभाऱ्यात पुष्प सजावट लक्षवेधी

Spread the love

इंद्रायणी आरतीस महिला भाविकांचा प्रतिसाद

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील इंदिरा एकादशी दिनी माऊली मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांतुन मंदिरात इंदिरा एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली.

लाखावर भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. एकादशी दिनी मंदिर आणि नगरप्रदक्षिणा करीत भाविकांनी हरिनाम गजरात श्रींचे दर्शन घेतले. मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावटीने श्रींचे रूप लक्षवेधी दिसत होते. आळंदी ग्रामस्थ व महिला भाविकांची इंद्रायणी आरतीस मोठी गर्दी झाली होती.
आळंदी मंदिरात भाविकांनी एकादशीस गर्दी करीत श्रींचे दर्शन घेतले. एकादशी दिनी श्रींचे मंदिरात पहाटे वेदमंत्र जयघोषात पवमान अभिषेक करण्यात आल्याचे आळंदी देवस्थांनचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.

भाविकांना श्रींचे मंदिर दर्शनास कमी वेळेत जास्त भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांनी मंदिर परिसरात रांगा लावून दर्शन घेतले. दुपारचा महानैवेद्य, वारकरी शिक्षण संस्थेचे वतीने परंपरेने प्रवचन, कीर्तन, रात्री धुपारती, शेजारती, हरिजागर झाला. श्रींचे दर्शन, प्रदक्षिणा पूर्वी भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर स्नानास गर्दी केली.
आळंदी मंदिरात भाविकांनी धुपारतीस देखील गर्दी केली. मंदिरात परंपरेने धार्मिक उपचार श्रीची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम झाले. भाविकांची कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शनास सुलभ व्यवस्था व्यवस्थापक माऊली वीर यांचे नियंत्रणात करण्यात आली. यावेळी सुरक्षा रक्षक, सेवक आणि मंदिरातील बंदोबस्ता वरील पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले. यासाठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस नाईक मछिंद्र शेंडे आदींनी बंदोबस्ताचे सुरळीत, सुरक्षिततेसाठी नियोजन केले.

आळंदीतील रहदारीची वर्दळ पाहता येथे वाहतुकीचे केलेले प्रभावी नियोजन यामुळे भाविक, नागरिक यांना वाहतुकीचे कोंडीतून राहत मिळाली. आळंदी पोलिसांनी रस्त्यावरील बेकायदेशीर पार्किंग केलेल्या गाडयांवर प्रभावी कारवाई केली. यामुळे आळंदीत नागरिक, व्यापारी, पोलीस मित्र यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले.

अलंकापुरीत एकादशी निमित्त इंद्रायणी नदी घाटाची स्वच्छता ; इंद्रायणीची आरती

यावेळी इंद्रायणी आरती सेवा समितीच्या प्रमुख संयोजक अनिताताई झुजम निलम कुरधोंडकर, अनिता शिंदे, सुवर्णाताई काळे, रेखा चव्हाण, सरस्वती भागवत, कौताबाई देवकर, सावित्री घुंडरे, शोभा उबाळे, सुमनबाई सोनवणे, उषा वर्तले, ओम वर्तेले ज्योती यादव, सुरेखा काळभोर, राजेंद्र जाधव, दत्ताराव तोतरे, संयोजक इंद्रायणी आरती सेवा समिती अर्जुन मेदनकर, ज्ञानेश्वर घुंडरे, गोविंद सुरेश तौर, तारामती गोरेउषाताई देसले, ज्योती यादव, पुष्पाताई भगवान लेंडकर, दिनकर तांबे, उषाताई वहिले आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी उपस्थित पाच महिला मान्यवरांचे हस्ते इंद्रायणी नदीचे पूजन औक्षण करून करण्यात आले. दर एकादशी दिनी इंद्रायणी आरती सेवा समितीचे वतीने इंद्रायणी आरती, स्वच्छता, रांगोळी, प्रसाद वाटप होवून पसायदानाने सांगता होते. या उपक्रमात सर्व भाविक, नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक अर्जुन मेदनकर, संयोजिका अनिताताई झुजम यांनी केले आहे.

तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती सेवा समिती, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाउंडेशन, आळंदी देवस्थान, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर घाट परिसर, स्वच्छता करीत इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली. एकादशी दिनी इंद्रायणीच्या आरती करून नदी घाट स्वच्छता करीत सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, अर्जुन मेदनकर यांनी सांगितले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आळंदी देवस्थान तर्फे रात्री उशिरा इंद्रायणी आरती वेद मंत्र जयघोषात झाली. यावेळी विश्वस्त ॲड रोहिणी पवार यांच्यासह सेवक, कर्मचारी, सुरक्षा रक्षक, पदाधिकारी, भाविक नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!