पिंपरी चिंचवड़मराठीशहर

पिंपळगाव गोलेगावात अखेर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

पिंपळगाव मध्ये ऊसतोड कामगारांवर बिबट्याचे हल्ल्यात कामगार जखमी

Spread the love

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील मौजे पिंपळगाव गोलेगाव येथे उपवनसंरक्षक जुन्नर, मा. सहाय्यक वनसंरक्षक, जुन्नर, व मा. वन परिक्षेत्र अधिकारी, चाकण यांच्या मार्गदर्शना खाली मालकी क्षेत्रात लावलेल्या पिंजऱ्यात अखेर बिबट्या जेरबंद झाला. पिंपळगाव मध्ये ऊसतोड कामगारांवर बिबट्याचे हल्ल्यात कामगार जखमी झाला होता.

या जेरबंद झालेल्या बिबट्यास तपासणी व उपचारासाठी बिबट निवारा केंद्र माणिकडोह येथे पाठविण्यात आले आहे.

या प्रसंगी वनपाल आळंदी आनंदकुमार इंदलकर. वनरक्षक दिपाली रावते, वनरक्षक नवनाथ पगडे, वन सेवक अजय कोळेकर, धनराज तोंडे, दौलत वाडेकर, किसन पारधी, राघू ठाकर यांचेसह इतर वन कर्मचारी उपस्थित होते.

पिंपळगाव तर्फे चाकण येथील सरपंच विलासराव नाथु काकडे यांचा जमीन गट नंबर २७ मध्ये शेतातील ऊसतोड कर्मचारी ऊसतोड करीत असताना ऊसतोड कर्मचारी अंबरसिंह महादु चव्हाण याच्यावर अचानक पणे बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते.

या वेळी इतर ऊसतोड कर्मचाऱ्यांनी मोठ्या मोठ्याने आरडा ओरडा केल्याने बिबट्याने ऊसतोड कामगारास जखमी अवस्थेत सोडून पळ काढला होता. त्यानंतर जखमी चव्हाण यांना तत्काळ आळंदी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. या वेळी सदर ऊसतोड सुरू असलेल्या शेतात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमा झाले होते. या पुढे देखील बिबट्या कडून ग्रामस्थ, ऊसतोड कामगार, शेतकऱ्यांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मुळे प्रभावी दक्षता उपाय योजना करण्याची मागणी करण्यात आली होती. या भागात तत्काळ वन विभाग अधिकारी कर्मचाऱ्यांनी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पै. बाळासाहेब चौधरी यांनी केली होती. त्या प्रमाणे वन विभागाने तत्काळ कारवाई करून पिंजरा लावला होता. त्यात बिबट्या जेरबंद करण्यास यश आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!