मराठीमहाराष्ट्रशहर

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून हालचालींना वेग, पार्थ पवारांच्या बैठकीत काय चर्चा झाली? आमदाराने आतली बातमी फोडली

Spread the love

पुणे; दि. १२ (शशिकांत पाटोळे) : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरुन राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलाय. पार्थ पवारांनी पुण्यातील आमदारांची बैठक बोलावली होती. पार्थ पवारांनी पुण्यातील जिजाऊ निवासस्थानी बैठक बोलावली होती. या बैठकीला मंत्री दत्तात्रय भरणे, शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके आणि भोरचे आमदार शंकर मांडेकर बैठकीला उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीनंतर आमदार शरद मांडेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आमदार शरद मांडेकर यांनी बैठकीत नेमकं काय घडलं, याविषयी माहिती दिली.

आमदार शरद मांडेकर म्हणाले, ‘आम्ही खरंतर दरवर्षी पाडव्याला अजितदादांना भेटायला जायचो. अजितदादांच्या निधनामुळे यंदा दिवाळी साजरी केली नाही. पवार कुटुंबीयांनी देखील दिवाळी साजरी करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांना भेटता आले नाही. सुनेत्रा पवार वहिनी पुण्यात आल्याचे कळाले. त्यामुळे त्यांना भेटायला आलो. त्यात दुष्काळ जाहीर झाला. दुष्काळ जाहीर झालेल्या तालुकांच्या यादीत मुळशीचं नाव आलं नाही. त्याचा पाठपुरावा सुनेत्रा पवार यांच्याकडे करायचा होता. वेगवेगळी विकासकामे आहेत. आचारसंहितेमुळे काही कामे रखडली होती. त्यामुळे वहिनीची भेट घेऊन लक्ष देण्याची विनंती केली’.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणवर शरद मांडेकर काय म्हणाले?

राष्टवादीच्या विलिनीकरणासंदर्भात मांडेकर म्हणाले, ‘विलिनीकरणावर काहीच चर्चा झाली नाही. आम्ही फक्त तीन आमदार होतो. तीन आमदार थोडीच विलिनीकरणावर चर्चा करतील. पार्थ पवार काहीच बोलले नाही. आमचं काम सुनेत्रा वहिनींकडे होते. पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडे सर्वच पक्षाचे लोक येतात. परंतु विलिनीकरणावर कोणतीही चर्चा झाली नाही. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल. आम्हाला निधी मिळतोय. सुनेत्रा वहिनी पालकमंत्री आहेत. मी अजितदादांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. त्यांचं कुटुंब जो निर्णय घेईल, तो मान्य राहील. ती दादांची इच्छा होती. आता सुनेत्रा वहिनी जो निर्णय घेईल, तो मान्य असेल. शेवटी गणित वरिष्ठ नेते ठरवतील. ते आम्हाला मान्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!