खेलजीवन शैलीब्रेकिंग न्यूज़शहर

आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या पंच्याहत्तारीकडे दिनेश गुंड यांची विक्रमी वाटचाल  

Spread the love

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने अथेन्स ( ग्रीस ) येथे २६ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या १७ वर्षा खालील जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघटनेच्या वतीने प्रा.दिनेश गुंड यांची तांत्रिक अधिकारी ( पंच ) म्हणून निवड करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर तांत्रिक अधिकारी म्हणून निवड होण्याची ही त्यांची ६५ वी वेळ असून लवकरच आंतरराष्ट्रीय स्पर्धाची पंच्याहत्तरी पूर्ण करून एक क्रीडा क्षेत्रातील विक्रमा कडे त्यांची वाटचाल सुरु आहे.

जागतिक कुस्ती संघटनेचे प्रा.दिनेश गुंड हे प्रथम श्रेणीचे पंच असून अशी आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणारे ते महाराष्ट्रातील एकमेव तांत्रिक अधिकारी आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली २० वर्षात त्यांनी आपल्या कामगिरीचा विक्रम नोंदविला आहे. सन २००३ पासून आता पर्यंत राज्य ,राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा प्रमुख, निवड समिती प्रमुख, पंचाना प्रशिक्षण देणे या कामामध्ये त्यांचे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील योगदान खूप मोलाचे आहे. त्यांच्या या यशा बद्दल कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, सरचिटणीस योगेश दोडके, कार्याध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे, उपाध्यक्ष संजय शेटे, संजय तीर्थंकर, सुनील चौधरी, सुनील देशमुख, मेघराज कटके, मारुती सातव, पै. बाळासाहेब चौधरी, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर आदींनी अभिनंदन केले. या मुळे आळंदी पंचक्रोशीचे नावलौकिकात वाढ झाली असल्याचे पै. बाळासाहेब चौधरी यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!