अॅटलास कॉप्को ग्रुपकडून पुण्यामध्ये नवीन अत्याधुनिक प्लांट लाँच

पुणे, : अॅटलास कॉप्को ग्रुपने पुण्यातील तळेगाव येथे नवीन उत्पादन प्लांट लाँच केला आहे. जवळपास २७०,००० चौरस फूट जागेवर पसरलेला नवीन अत्याधुनिक प्लांट एअर व गॅस कॉम्प्रेसर्स आणि सिस्टम्ससह सीएनजी (कॉम्प्रेस्ड नॅच्युरल गॅस), बायोगॅस, हायड्रोन कॉम्प्रेसर्स, एअर ड्रायर्स, एन२ व ओ२ जनरेटर्स आणि मेडिकल फिल्टर्स व अॅक्सेसरीजचे उत्पादन करेल. २०२३ मध्ये या लाँचची घोषणा करण्यात आली होती, जे नाविन्यपूर्ण सोल्यूशन्स प्रगत करण्याप्रती, तसेच स्थानिक बाजारपेठेसाठी डिझाइन करण्यात आलेली उच्च दर्जाची उत्पादने वितरित करण्याप्रती ग्रुपची कटिबद्धता अधिक दृढ करते.
हा उत्पादन प्लांट इंडस्ट्री ४.० तत्त्वांवर निर्माण करण्यात आला आहे, ज्यामध्ये स्मार्ट उत्पादन तंत्रज्ञान व शाश्वततेचा समावेश आहे. प्लांट कार्यसंचालनांसाठी आवश्यक असलेल्या ऊर्जेपैकी जवळपास ८० टक्के ऊर्जा १.३ मेगावॅट रूफटॉप सोलार सिस्टम आणि ग्रिड पुरवठ्यामधून मिळवण्यात येईल. या प्लांटमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि प्रगत कूलिंग सिस्टम्स देखील आहेत. अॅटलास कॉप्को ग्रुपने संशोधन व विकासासाठी पाठिंब्यावर प्रबळ फोकस करण्यासह हा प्लांट विद्यमान व भावी उत्पादन आणि उत्पादन विकास गरजांची पूर्तता करण्यासाठी विविध चाचणी क्षमतांसह सुसज्ज आहे. कंपनी ISO 9001, ISO 45001, ISO 14001 आणि ISO 50001 प्रमाणनांसह प्रमाणित आहे. या प्रमाणनांमधून उच्च दर्जा, सुरक्षितता, पर्यावरणीय व ऊर्जा मानकांची खात्री मिळते, ज्याला प्रबळ अंतर्गत ऑडिट सिस्टम, दर्जात्मक मॅनेजमेंट सिस्टम्स आणि सहा सिग्मा पद्धतींचे पाठबळ आहे, ज्या त्रुटी कमी करत आणि कार्यक्षमता वाढवत व्यवसाय प्रक्रिया सुधारण्यास मदत करतात.
कॉम्प्रेसर टेक्निक बिझनेस एरियाचे अध्यक्ष फिलिप एर्नेन्स या नवीन प्लांटच्या घोषणेबाबत मत व्यक्त करत म्हणाले, “हा नवीन प्लांट स्थानिक मागणीची पूर्तता करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज आहे, ज्यामधून कमी लीड वेळ आणि मोठ्या क्षमतेची खात्री मिळते. यामुळे आम्ही उत्पादनांची व्यापक श्रेणी देण्यास, बाजारपेठेतील अपेक्षांची पूर्तता करण्यास आणि सर्वोत्तम जीवनचक्र पाठिंबा देण्यास सक्षम होतो, ज्यामुळे उच्च दर्जाचे सोल्यूशन्स वितरित करण्याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ होत आहे.”
अॅटलास कॉप्को (इंडिया) प्रा. लि.चे उपाध्यक्ष – व्यवस्थापकीय संचालक थिएरी मोनार्ट म्हणाले, “आमच्या नवीन उत्पादन प्लांटचे लाँच अॅटलास कॉप्को ग्रुपच्या भारताील विकास प्रवासामधील महत्त्वाचा टप्पा आहे. हा प्लांट स्थानिकीकरणाप्रती आमच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो, तसेच प्रांतामध्ये रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासाला गती देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका देखील बजावतो. स्थानिक टॅलेंट व नाविन्यतेला चालना देत आमचा भारतातील उत्पादन इकोसिस्टमप्रती अर्थपूर्णपणे योगदान देण्याचा मनसुबा आहे.”