लोणकर विद्यालयात ओळख श्री ज्ञानेश्वरीची उपक्रमास प्रारंभ
१०२ व्या शाळेतील उपक्रमात हरिनामजयघोष

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील शालेय विद्यार्थात बुध्दी कौशल्य, स्मरण शक्ती वाढवणे तसेच संतांच्या ग्रंथांची ( ज्ञानेश्वरीची व हरिपाठ) ओळख व्हावी यासाठी लोकप्रिय उपक्रम शालेय मुलांना मूल्य शिक्षणातून संस्कारक्षम शिक्षण देण्याचा भाग म्हणून लोणकर विद्यालयात ओळख श्री ज्ञानेश्वरीची उपक्रमास हरिनामजयघोष करीत सुरुवात करण्यात आली. श्रींचे प्रतिमा पूजन, ग्रंथ पूजन, दीप पूजन करीत १०२ व्या शाळेत उत्साहात या उपक्रमाचा प्रारंभ झाला.
श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती, श्री ज्ञानेश्वरी एक परिवार या माध्यमातून श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश तात्या काळे यांच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी आळंदी यांच्या विशेष सहकार्याने प्राचार्य अनिता शिंदे यांनी विशेष परिश्रम घेत उपक्रमाची सुरुवात केली. या प्रसंगी ह.भ.प. मारुती महाराज गलांडे अध्यक्षतेस्थानी होते.
यावेळी ह.भ.प. प्रतीक महाराज वाबळे यांनी या उपक्रमाची माहिती देत मोबाईलचे फायदे, तोटे समजून सांगितले, ह.भ.प.बालाजी महाराज कुलथे यांनी सांप्रदायिक परिवाराला जोडलेले विद्यार्थी व न जोडलेले यांचा फरक मांडला. चांदगुडे महाराज यांनी ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा उपक्रम मुलांना कसा लाभ दायक आहे. यावर भाष्य केले. ज्ञानेश्वर राऊत, राजाभाऊ पठारे, ज्ञानेश्वर ताम्हाणे, मधुकर गायकवाड, कोद्रे, गोफणे, भोसले ही स्थानिक सांप्रदायिक मंडळींनी सहकार्याची भावना या प्रसंगी व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगतात मारुती गलांडे यांनी संत साहित्य विद्यार्थी जीवनात कसे लाभदायी आहे. ते सांगून शरीराचा चेहरा मोहरा चांगलं दिसण्यात वेळ घालवण्या पेक्षा मन, बुध्दी कशी सुंदर ठेवता येईल. ते मुले या उपक्रमातून शिकतील असे सांगितले. यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी यांनी उपलब्ध करून दिलेले संत साहित्य प्रशालेस सुपूर्द करण्यात आले. कैलास आव्हाळे यांनी शाळा, शिक्षक , विद्यार्थी यांना हरिपाठ, ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीची हे संदर्भ अभ्यासक्रम पुस्तकांसह संत साहित्य प्रशालेस सुपूर्द केले. नियोजन पर्यवेक्षक लोहकरे सर् यांनी केले. सुत्रसंचलन मोरे सर् यांनी केले.
सामुदायिक पसायदानाने उपक्रमाची सांगता झाली.