खेलब्रेकिंग न्यूज़शहर

‘पीडीएफए महिला लीग’ २०२४-२५ फुटबॉल स्पर्धा !!

युनायटेड पुना स्पोटर्स अकादमी, क्रिडा प्रबोधिनी अ‍ॅकॅडमी, डेक्कन इलेव्हन संघांची विजयी सलामी !!

Spread the love

पुणे.  पुणे जिल्हा फुटबॉल संघटना आणि उत्कर्ष क्रिडा मंच कोथरूड एफसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पीडीएफए महिला लीग २०२४-२५’ फुटबॉल स्पर्धेत युनायटेड पुना स्पोटर्स अकादमी, क्रिडा प्रबोधिनी अ‍ॅकॅडमी आणि डेक्कन इलेव्हन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली.

बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रिडानगरी मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत अस्मिता लांडगे हिने केलेल्या गोलाच्या जोरावर युनायटेड पुना स्पोटर्स अकादमीने सिटी गर्ल्स गो स्पोटर्स संघाचा १-० असा पराभव करून विजयी सलामी दिली. क्रिडा प्रबोधिनी अ‍ॅकॅडमीने पुणे सॉकर क्लबचा १६-० असा सहज पराभव केला. सामन्यामध्ये सौम्या शेख हिने सर्वाधिक ५ गोल केले. साक्क्षी हिवळे आणि इशिता घोशाल यांनी प्रत्येकी ३ गोल तर, नैना तक्क्षक हिने २ गोल केले. तनिशा शिरसुळ, साक्क्षी इंगळे आणि पुर्वा गायकवाड यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. डेक्कन इलेव्हन संघाने पुना स्पोटर्स अकादमीचा ११-० असा धुव्वा उडविला. मैत्रयी बिराजदार हिने ५ गोल तर, सानिका देशपांडे हिने २ गोल नोंदविले. इशानी कुलकर्णी, गझल देशमाने, मुद्रा बापट आणि संपदा वेलंका यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.
स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेविका श्रीमती पुष्पा कनोजिया, माजी हॉकी खेळाडू श्रीमती किरण चौधरी, पीडीएफएचे उपाध्यक्ष प्यारेलाल चौधरी आणि सचिन प्रदीप परदेशी आणि युकेएम कोथरूड एफसीचे अध्यक्ष वसंत कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फुटसाल इंडियाच्या खेळाडू वैष्णवी बराटे, पुजा गुप्ता, आर्या मोरे आणि रितिका सिंग आदि मान्यवर उपस्थित होते.

सामन्यांचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः
१) युनायटेड पुना स्पोटर्स अकादमीः १ (अस्मिता लांडगे ७ मि.) वि.वि. सिटी गर्ल्स गो स्पोटर्सः ०; सर्वोत्कृष्ठ खेळाडूः अस्मिता लांडगे;
२) क्रिडा प्रबोधिनी अ‍ॅकॅडमीः १६ (सौम्या शेख ५ गोल, साक्क्षी हिवळे ३ गोल, इशिता घोशाल ३ गोल, नैना तक्क्षक २ गोल, तनिशा शिरसुळ, साक्क्षी इंगळे, पुर्वा गायकवाड) वि.वि. पुणे सॉकर क्लबः ०; सर्वोत्कृष्ठ खेळाडूः सौम्या शेख;
३) डेक्कन इलेव्हनः ११ (मैत्रयी बिराजदार ५ गोल, सानिका देशपांडे २ गोल, इशानी कुलकर्णी, गझल देशमाने, मुद्रा बापट, संपदा वेलंका) वि.वि. युनायटेड पुना स्पोटर्स अकादमीः ०; सर्वोत्कृष्ठ खेळाडूः मैत्रयी बिराजदार;

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button