खेलपुणेमराठीशहर

‘अमानोरा-फ्लेक्स्एनफ्लो करंडक’ स्नुकर अजिंक्यपद स्पर्धा

अभिजीत रानाडे याला विजेतेपद !!

Spread the love
पुणे .फ्लेक्स् एन फ्लो फिटनेस स्टुडिओ यांच्या तर्फे आयोजित ‘अमानोरा फ्लेक्स्एनफ्लो करंडक’ स्नुकर अजिंक्यपद निमंत्रित स्पर्धेत अभिजीत रानाडे याने सुरज राठी यांचा ४-१ असा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

हडपसर येथील अमानोरा फर्न क्लब येथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये डेक्कन जिमखानाच्या अभिजीत याने पुना क्लबच्या सुरजचा ४-१ असा सहज पराभव केला. सामन्याच्या सुरूवातीला सुरजने ६५-२० अशी फ्रेम जिंकून १-० अशी आघाडी मिळवून आश्वासक सुरूवात केली. परंतु यानंतर अभिजीत याने सामन्यामध्ये वर्चस्व गाजवले. ६८-५५, ७५-४०, ८५-१०, ६०-४८ अशा पुढच्या सर्व फ्रेम जिंकत अंतिम सामन्यामध्ये सुरजला विजयाची जराशी सुद्धा संधी दिली नाही.

याआधी झालेल्या उपांत्य फेरीत अभिजीत रानाडे याने पिनाक अनाप याचा ६५-२४, २४-५९, ७२-३४, ६८-४१, ६२-३६ असा पराभव केला. सुरज राठी याने सोनु मातंग याचा २२-४६, ५६-२१, ६६-३५, ११-५४, ६७-३१, ६४-३३ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण फ्लेक्स् एन फ्लोचे फिटनेस स्टुडिओचे संचालक सचिन संचेती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समर खंडेलवाल, गौरव देशमुख, आरव संचेती असे खेळाडू उपस्थित होते. विजेत्या अभिजीत याला ५० हजार रूपये आणि करंडक देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकालः उपांत्य फेरीः
अभिजीत रानाडे वि.वि. पिनाक अनाप ४-१ (६५-२४, २४-५९, ७२-३४, ६८-४१, ६२-३६);
सुरज राठी वि.वि. सोनु मातंग ४-२ (२२-४६, ५६-२१, ६६-३५, ११-५४, ६७-३१, ६४-३३);

अंतिम सामनाः
अभिजीत रानाडे वि.वि. सुरज राठी ४-१ (२०-६५, ६८-५५, ७५-४०, ८५-१०, ६०-४८).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button