मार्व्हेल रिअल्टर्सकडून ‘बॅसिलो’ प्रकल्प सादर, कोरेगाव पार्कमध्ये अशा प्रकारचा पहिला लक्झरी टॉवर

भारतातील सर्वाधिक प्रतिष्ठित परिसरांपैकी एक असलेल्या, पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील लेन क्रमांक ५ येथे, मार्व्हेल रिअल्टर्सने त्यांच्या नव्या अल्ट्रा-लक्झरी प्रोजेक्ट ‘बॅसिलो’ची अधिकृत घोषणा केली आहे. प्रशस्त निवासस्थानं, अत्याधुनिक डिझाइन आणि संपूर्णपणे विचारपूर्वक आखलेली सुविधा व्यवस्था याच्या आधारे, ‘बॅसिलो’ हा प्रकल्प शहरी जीवनशैलीसाठी एक नवा मानदंड ठरणार आहे.
या प्रकल्पाच्या घोषणा प्रसंगी बोलताना, मार्व्हेल रिअल्टर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत झवर यांनी सांगितले की, “लक्झरी ही केवळ फिनिशेस आणि अॅमेनीटीजपुरती मर्यादित नाही, तर लक्झरी म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या जागेने दररोज आपल्याला दिलेला अनुभव असतो. कोरेगाव पार्क हे पुण्याचे रत्न आहे आणि लेन ५ ही त्यातील खास ओळख असलेले ठिकाण. ‘बॅसिलो’ म्हणजे फक्त एक प्रॉपर्टी नव्हे, तर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी खासगीपणा, हिरवळ, मोकळीक, सुसंस्कृती आणि शांततेचा अनुभव देणारी वास्तू आहे.”
‘बॅसिलो’मध्ये ३, ३.५ आणि ४.५ बीएचके आकारातील अतिशय प्रशस्त फ्लॅट्स असून त्यांचा कार्पेट एरिया १५२५ ते ४५०० चौ. फूटांपर्यंत आहे. घरांची रचना अशा पद्धतीने केली आहे की, त्यातून पाचतारांकित हॉटेलसारखा अनुभूव मिळेल. प्रत्येक घरात संपूर्ण मार्बल फ्लोअरिंग, प्रत्येक खोलीत उबदार इंजिनियर्ड वुड फ्लोअर, मार्बल फिनिशेस असलेले मास्टर बाथरूम्स आणि डिशवॉशर, मायक्रोवेव, ओव्हन अशा सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय, प्रत्येक घरामध्ये शांत, स्थिर आणि कार्यक्षम अशी VRV/VRF एअर कंडिशनिंग सिस्टम देण्यात आली आहे.
‘बॅसिलो’मध्ये फक्त घरच नव्हे, तर जीवनशैलीही प्रीमियम आणि सुसंस्कृत असावी यासाठी सर्वोत्तम अॅमेनीटी स्पेस तयार करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्किटेक्ट्स, लाईटिंग स्पेशालिस्ट्स, इंटीरियर डिझाइनर्स आणि लँडस्केप आर्टिस्ट्स यांचे पथक या प्रकल्पासाठी काम करत आहे.
‘बॅसिलो’ प्रमुख सुविधा:
- लँडस्केप गार्डन, ग्रँड गेटेड एंट्रन्स, स्विमिंग पूल
- फुली इक्विप्ड जिम, स्टीम, सॉना, जकुझी, सलून व योगा स्टुडिओ
- एंटरटेनमेंट लाऊंज, खुल्या जागेत व्हिडीओ स्क्रीनिंग, बार आणि किचन
- प्रायव्हेट थिएटर, गेम झोन, पोकर रूम
- बोर्डरूम्स, मीटिंग लाऊंजेससह बिझनेस सेंटर आणि कोवर्किंग स्पेसेस
- मल्टीपर्पज प्ले कोर्ट्स, स्क्वॉश कोर्ट, वॉकिंग ट्रॅक्स
- कर्मचारी व ड्रायव्हर्ससाठी स्वतंत्र लाऊंज, शॉवर, बंक बेड्स, आणि कार वॉश स्टेशन
- लहान मुलांसाठी सुबकपणे नियोजित प्ले एरिया
‘बॅसिलो’ हा प्रकल्प कोरेगाव पार्कसारख्या शांत आणि हिरवळीने नटलेल्या परिसरात असला, तरी तो पुण्यातील सर्व महत्त्वाच्या शाळा, हॉस्पिटल्स, कॅफे, क्लब, रेस्टॉरंट्स आणि बिझनेस डिस्ट्रिक्ट्सपासून अगदी जवळ आहे. पुण्यासारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात, मोठ्या फॉरमॅटमध्ये लक्झरी अपार्टमेंट्सची उपलब्धता मर्यादित असताना, ‘बॅसिलो’ ही गरज पूर्ण करणारा महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे.
हा प्रकल्प २० महिन्यांत तयार होण्याची अपेक्षा असून, ‘बॅसिलो’ पुण्यातील नव्या युगातील घरमालक आणि ग्लोबल गुंतवणूकदारांसाठी एक आदर्श निवड ठरणार आहे. घर उभारण्याच्या पलीकडे जाऊन, मार्व्हेल रिअल्टर्स इथे एक आयुष्य जगण्याची नवीन शैली तयार करत आहे.