रिसोड नगरपरिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (उ.बा.ठा.) विजय दावा होणार..कांटे की टक्कर

रिसोड प्रतिनिधी(बद्रीनारायण घुगे).रिसोड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ नेवडणुकीत राजकीय वातावरण वांगलेच तापले असून, ठाकरे गट (उ .बा. ठा. ) उमेदवार नगर अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला असुन दुसरीकडे भारतीय जनता पार्टी यांच्या नगर अध्यक्ष पदासाठी उमेदवार अर्ज दाखल केला आहे.
दोन्ही प्रमुख पक्षांनी विजयी होण्याचा ठाम दावा केल्याने निवडणूक ‘कांटे की टक्कर’ होणार, अशी चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. परंतु, भाजप आणि उ. बा ठा पक्षांनीसुद्धा कंबर कसली आहे. मात्र, मतदार कोणाला संती देणार हे लवकरच कळणार आहे.
रिसोड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गल्लीत -प्रत्येक बूथवर जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे. भाजपा
आणि शिवसेना (उ बा. ठा)
या दोन प्रमुख पक्षात लढत होत आहे. परंतु, भाजपने नगराध्यक्ष पदासह द्वारा प्रभागात उमेदवार उभे केले आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे गट पक्षाची शहरात नाकत कमी असली तरी त्यांना कमी
लेखून चालणार नाही, कारण विजयी उमेदवारांना याचा फटका बसू शकतो.
भाजपा विकासकामांचा मुद्दा पुढे केला जात असून, रिसोड
सर्वांगीण प्रगतीचा मार्ग आम्हीच दाखवला असल्याचा दावा केला आहे. भविष्यात राज्य सरकारच्या माध्यमातून शहरातील पाणी पुरवठा, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन यावर धोरणात्मक काम करणार असल्याची ग्वाही दिली जात आहे, तर शिंदेसेनेने आजवर राबवलेल्या विविध योजनांचा दाखला देत शहरात मोठी विकासकामे आम्ही केली असून पुढील काळातही रिसोड स्वच्छ सुंदर रिसोड करण्याचा नारा दिला आहे.
आरोप-प्रत्यारोपांमुळे उत्सुकता शिगेला
मतदार मात्र शांतपणे दोन्ही पक्षांचे प्रचार, भूमिका आणि उमेदवारांचा स्वभाव जाणून घेत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर वाढलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे उत्सुकता शिगेला पोहोचली असून, अखेरचा क्षणापर्यंत समीकरणे पालटण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील विकासाचे वादे सर्वच राजकीय पक्षांनी केले असले तरी तसा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही.
पक्षीय पातळीवर प्रचारात भावनिक सूर
पक्षनिष्ठा, जुने कार्यकर्ते, घराणेशाहीचे भांडवल, “आपल्यावर केलेली उपकाराची आठवण’ अशा संदेशांनी मतदारांना भावनिकरीत्या बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, दुसरीकडे तरुण मतदार, कामधंद्यासाठी रिसोड स्थायिक झालेले नागरिक आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारवर्गात विकासाची भाषा अधिक परिणामकारक



