जीवन शैलीब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

जगप्रसिद्ध रिदमिक जिम्नॅस्ट आणि प्रसिद्ध ड्रमर शिवमणी बनले ड्रग्ज विरोधी मोहिमेचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

भोई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अमली पदार्थ विरोधी गणेशोत्सव 2025

Spread the love

 पुणे. जगप्रसिद्ध ड्रम वादक शिवमणी यांच्या तालवादनाने पुणेकरांना अक्षरश: मंत्रमुग्ध केले आणि त्यांना नादब्रह्ममाची अनुभूती दिली.निमित्त होते पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अमली पदार्थ विरोधी गणेशोत्सव 2025 मधील गणेश भक्तांसाठी कृतज्ञता समारंभाचे. परवाची संध्याकाळ पुणेकरांना अक्षरशः स्वर्गीय संगीताचा आनंद देणारी ठरली, पुणेकर त्यात न्हाऊन निघाले.
संगीत ही परमेश्वराच्या जवळ नेणारी गोष्ट आहे . अध्यात्म आणि संगीत या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.जी व्यक्ती संगीताची साधना करते ती कोणत्याही अमली पदार्थाचे व्यसनांच्या नादी लागत नाही . वाहवत चाललेल्या तरुण पिढीला जर या राक्षसापासून दूर करायचे असेल तर संगीता सारखे दुसरी शस्त्र नाही. भोई प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे मी भारावून गेलो असून अमली पदार्थ विरोधी मोहिमेचा ब्रँड अँबेसेडर होण्यास मला आनंदच वाटेल असे प्रतिपादन जगप्रसिद्ध तालयोगी सुप्रसिद्ध ड्रम वादक शिवमणी यांनी केले.


त्यांनी हे आवाहन करताच पुणेकरांनी जल्लोष केला आणि त्यांना वादनाची विनंती केली.
त्यांनी सुद्धा कोणतीही औपचारिकता न ठेवता अक्षरशः टेबल ,माईकचा बॉक्स, कागदाची फाईल या वस्तूंचा वापर करून तालवदन करून पुणेकरांना समोहित केले, आपल्या तालावर नाचायला लावले.
या अनोख्या भेटीमुळे गणेशभक्त, शालेय विद्यार्थी आनंदित होऊन त्यांनी या प्रकल्पाची व्याप्ती वाढवण्यासाठी आम्ही सर्वजण कटीबद्ध राहू असे आश्वासन त्यांनी शिवमणी यांना दिले.
या प्रसंगी महाराष्ट्र पोलीस अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे उपमहानिरीक्षक श्री प्रवीण पाटील, पुण्याचे सह पोलीस आयुक्त श्री रंजन कुमार शर्मा ,आ.हेमंत रासने , ज्येष्ठ विचारवंत कृष्णन श्रीनिवासन, विविध संस्था आणि गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. खा. डॉ. सौ मेधा कुलकर्णी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होत्या.
कार्यक्रमाचे संयोजक, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि अमली पदार्थ विरोधी मोहिमेचे समुपदेशक प्रा. डॉ.मिलिंद भोई यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामाची भूमिका स्पष्ट करताना शाळा आणि कॉलेजमध्ये या पदार्थांचा वाढलेला वावर ही अतिशय चिंताजनक बाब असून, डॉ. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी तरुण पिढी ही मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे. अमली पदार्थांचा राक्षस आता आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचला आहे, त्याच्याशी लढण्यासाठी राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, गणेश उत्सव मंडळे, प्रसारमाध्यमे यांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असून या विषयात भोई प्रतिष्ठान गेली 20 वर्ष कार्यरत आहे.
शिवमणी सारख्या जगप्रसिद्ध व्यक्तींनी याचे ब्रँड अँबेसिडर पद स्वीकारल्याने या उपक्रमाची व्व्याप्ती आणखी वाढेल असे
प्रतिपादन केले.
महाराष्ट्र पोलीस अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील यांनी बोलताना महाराष्ट्र पोलीस हे सदैव अशा उपक्रमांसाठी पाठीशी राहतील असे सांगून या उपक्रमात गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी या प्रश्नाचे मूळ शोधताना एकत्रित कुटुंब पद्धतीचा आणि पालकांकडून होणारे संस्कार याचा ऱ्हास असल्याचे सांगून गुन्हेगारी आणि अमली पदार्थ हे एकत्रित राहतात. भोई प्रतिष्ठानने केलेल्या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
खा.डॉ. मेधा कुलकर्णी यांनी या प्रश्नावर केंद्र सरकारचे लक्ष वेधून त्यासाठी व्यापक स्वरूपात कार्यरत राहणार असल्याचे प्रतिपादन करून पुण्यामध्ये सुरू झालेली मोहीम देशातच नव्हे तर जगभर पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी गतवर्षी संपन्न झालेल्या अमली पदार्थ मुक्त गणेशोत्सव 2024 यात सहभागी गणेशभक्त आणि संस्थांना कृतज्ञता पत्र देऊन गौरवण्यात आले.
लेडी रमाबाई हॉल, एस पी कॉलेज येथे हा कार्यक्रम पार पडला.
आशिष जराड यांनी सूत्रसंचालन केले, विनीत परदेशी यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!