मनोरंजनमराठी

चोरडिया परिवाराचा सामाजिक कार्याचा असाही वसा..

अपंग कल्याणकारी संस्थेत ‘जीना इसी का नाम है’

Spread the love

पुणे : रंगकर्मी दिवंगत संतोष चोरडिया यांच्या कुटुंबियांनी आणि मित्र परिवाराने चोरडिया यांच्या सामाजिक कार्याचा वारसा जपत सुरू ठेवला आहे. दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

संतोष चोरडिया यांनी ‘जीना इसी का नाम है’ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून वेगळेपणा जपला होता. हाच वसा पुढे सुरू ठेवण्यात आला आहे. रंगकर्मी चोरडिया फाऊंडेशन आणि आयलीज् डान्स अकॅडमीतर्फे वानवडी येथील अपंग कल्याणकारी संस्थेत ‘जीना इसी का नाम है’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. त्यानंतर उपस्थित कलाकारांनी विविध गाणी सादर केली. नृत्य, गीत आणि हास्यकिस्से अशा मनोरंजनपूर्ण कार्यक्रमाचा संस्थेतील दिव्यांग मुलांनी भरपूर आनंद लुटला. गायक राजेश शिंगाडे आणि गायिका डॉ. अश्विनी रानडे यांच्या गीतांना या मुलांनी दाद दिली तर अभिनेत्री आयली घिया व आयलीज् डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी या मुलांना नृत्यात सामील करून त्यांचे मनोरंजन केले.

या प्रसंगी स्व. संतोष चोरडिया यांचे सुपुत्र अजिंक्य चोरडिया यांनी अनेक किस्से सांगून मुलांना खळखळून हसवले. त्यांनी केलेल्या मकरंद अनासपुरेंच्या मिमिक्रीने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली. या कार्यक्रमात संस्थेतील १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. झिंगाट गाण्यावर ताल धरून कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कविता घिया आणि अजिंक्य चोरडिया यांनी केले तर विजय भोंडे, श्रीकांत खडके, राजू विधाते यांनी साथसंगत दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button