ब्रेकिंग न्यूज़मनोरंजनमराठी

पुण्यात थाटात पार पडला ठाकूर अनुप सिंगचा ‘Romeo S3’ प्रमोशन दौरा

Spread the love

पुणे.पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालत, सुप्रसिद्ध अभिनेता ठाकूर अनुप सिंग यांनी आपल्या बहुप्रतिक्षित अ‍ॅक्शन-पॅक्ड चित्रपट Romeo S3 च्या प्रमोशन दौऱ्याचा भव्य शुभारंभ पुण्यात केला. देशभरातील प्रदर्शनाआधी पार पडलेल्या या दौऱ्यात पुण्याच्या परंपरा, आठवणी आणि चाहत्यांच्या प्रेमाने अनुप सिंग भारावून गेले.

 

दौऱ्याची सुरुवात अनुप सिंगने श्रद्धेने भरलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे दर्शन घेऊन केली. त्यानंतर तो आपल्या कॉलेजच्या आठवणींना उजाळा देत फर्ग्युसन कॉलेजला गेले, जिथून त्यांनी आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली होती.

 

प्रसिद्ध डेक्कन चौकात अनुप सिंगने छत्रपती संभाजी महाराजांच्या आरतीत सहभागी होऊन पुण्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेला अभिवादन केले. यानंतर खराडी येथील प्रमोशनल कार्यक्रमात ते चाहत्यांच्या भेटीला गेले, जिथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात अनुपने चाहत्यांशी संवाद साधत Romeo S3 च्या चित्रीकरण अनुभवांबद्दल सांगितले.

 

Romeo S3 या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक गुड्डू धनोआ यांनी केले असून, यात अनुप सिंगने डीसीपी संग्राम सिंग शेखावत या कणखर आणि तडफदार पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे, जो गोव्यातील गुन्हेगारी सिंडिकेटच्या मुसक्या आवळतो. या चित्रपटात अभिनेत्री पलक तिवारी मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

चित्रपट डॉ. जयंतीलाल गडा (Pen Studios) यांच्याद्वारे सादर करण्यात आला आहे, तर निर्मिती धवल गडा आणि Wild River Pictures यांची असून, वितरणाची धुरा Pen Marudhar यांनी सांभाळली आहे.

 

अनुप सिंग म्हणाले, पुण्याने मला खूप काही दिलं आठवणी, शिस्त आणि एक भक्कम पाया. Romeo S3 च्या निमित्ताने इथे परत येणं हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि पूर्ण सर्कल क्षण आहे.

Romeo S3 ही चित्रपटगृहात धडकी भरवणारी कथा, जबरदस्त अ‍ॅक्शन आणि हृदयस्पर्शी अभिनयाने सजलेली असेल, जी प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजेल.

Romeo S3 सर्वत्र १६ मे २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button