
निवडीचे पंचक्रोशीत स्वागत ; सत्कारांचा वर्षाव
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : तीर्थक्षेत्र आळंदीचा विकास साधत असताना यापुढील काळात अधिक गतीने उर्वरित विकास कामे मार्गी लावली जातील. येत्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत सर्व संबंधित घटक, पदाधिकारी, वारकरी, भाविक यांना विश्वासात घेऊन आळंदी नगरपरिषदेत भाजपाची सत्ता आणणार असल्याचे विश्वास व्यक्त करीत भाजपचे कार्यकर्त्यांनी हि झटून कामाला लागावे असे आवाहन आळंदी नगरपरिषद माजी नगराध्यक्षा व भाजप आळंदी शहर मंडळ नवनियुक्त अध्यक्षा वैजयंता अशोक उमरगेकर यांनी केले.
भारतीय जनता पार्टी आळंदी शहर मंडल अध्यक्ष पदी आळंदी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष वैजयंता अशोक उमरगेकर यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती केली. या निवडीचे आळंदी पंचक्रोशीतून स्वागत करण्यात आले. नियुक्ती निमित्त भाजपा आळंदी शहर मंडल आजी, माजी पदाधिकारी, पक्ष संघटनेच्या विविध शाखेतील पदाधिकारी, भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते यांच्या वतीने हॉटेल अशोक येथील सभागृहात नवनियुक्त आळंदी शहर मंडल अध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांचा सत्कार मोठ्या उत्साहात करण्यात आला. या प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, प्रशांत कुऱ्हाडे, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, हनुमंत तापकीर, उज्जवला पेठकर, संकेत वाघमारे, मंगलाताई हुंडारे, संगीता फपाळ, शेतकरी बचाव आंदोलनाचे उपाध्यक्ष बाळासाहेब पेटकर, उद्योजक बाळासाहेब वडगावकर, बंडूनाना काळे, माजी नगरसेविका सुनीता रंधवे, बंडूनाना काळे, मंडूबाबा पालवे, कृष्णा पालवे, संजय घुंडरे पाटील, सुजित काशीद, वासुदेव तुर्की आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध पदाधिकारी यांनी नवनियुक्त अध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांचा सत्कार करीत या निवडीचे पंचक्रोशीतून जोरदार स्वागत केले.
या निवडीमुळे येत्या काळात आळंदी नगरपरिषद निवडणूक होत असल्याने त्यांच्या कार्याचा गौरव पक्ष संघटनेने करून त्यांच्यावर आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक जबाबदारी दिली असल्याची चर्चा होत आहे. यावेळी मंडळ अध्यक्षा उमरगेकर म्हणाल्या मोठ्या मनाने पक्ष संघटनेने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे यशस्वीपणे पार पाडील अशी खात्री देत आहे. आळंदी नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपची सत्ता आणण्याचा संकल्प जाहीर करीत सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, पक्ष संघटनेतील सर्व संबंधित घटकांना, शहरातील नागरिकांना, वारकरी भाविक, संस्था चालक यांना विश्वासात घेऊन पक्ष संघटनेने ठेवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी निश्चित प्रयत्न केला जाईल. यासाठी त्यांनी ग्वाही देत सर्वांनी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी नगरसेवक अशोक उमरगेकर यांनी नवनियुक्त आळंदी मंडळ शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांचे कार्यकाळात तीर्थक्षेत्र आळंदीचा भरीव विकास केला असल्याचे सांगत पक्ष संघटनेने या पदासाठी अनेक मान्यवर इच्छुक असताना ही जबाबदारी माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे वर दिली. यातून पक्ष संघटनेने त्यांचे कार्याचा सन्मान ठेवत जबाबदारी दिल्याचे त्यांनी सांगितले. यापुढील काळात आळंदीचा विकास अधिक गतीने करण्यास त्या निश्चित प्रयत्न करतील. यावेळी माजी नगरसेवक उमरगेकर यांनी पक्षाचे माध्यमातून खूप विकास कामे केल्याचे सांगत साड्या नगरपरिषद मध्ये प्रतिनिधी नसल्याने आळंदीतील नागरी समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. प्रशासकीय राजवट असल्याने नागरी सेवा सुविधा मिळण्यास विलंब होत आहे. यात पिण्याचे पाणी उपलब्ध असून ते वितरित होत नाही, कचरा समस्या, ड्रेनेज समस्या असून केवळ प्रतिनिधी नसल्याने निर्माण झाल्या आहेत. यापुढील कळत निवडणुकां होत आहेत. पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन क्रियाशील पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विविध समिती, महामंडळ, विशेष कार्यकारी अधिकारी, अशा विविध पदावर नियुक्ती, निवड करून न्याय दिला जाईल. पक्षाशी मात्र एकनिष्ठ राहण्यास त्यांनी सांगण्यास विसरले नाहीत.
यावेळी संजय घुंडरे पाटील म्हणाले, आळंदीतील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. येथील वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार झाल्या प्रकरणी या पुढील काळात कोणत्याही संस्थेला अशा उद्योगामुळे पाठीशी घातले जाणार नाही. ज्या वारकरी शिक्षण संस्था चांगले काम करीत आहेत. त्यांच्या पाठीशी राहू मात्र आळंदी शहराचे नाव बदनाम करणाऱ्या घटनांमुळे संबंधित संस्था चालकांना त्यांच्या गैर कृत्यांना कधीही पाठीशी आळंदीकर घालणार नाही. असे सांगत गैरकृत्य करणाऱ्या संस्था विषयी रोष ही व्यक्त केला. यावेळी माजी नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, सुनीता रंधवे, बाळासाहेब पेठकर, सुजित काशीद, वासुदेव तुर्की, मंडूबाबा पालवे, संकेत वाघमारे, मंगलाताई हुंडारे आदी मान्यवर यांनी मनोगते व्यक्त केली. आळंदी जनहित फाउंडेशन तर्फे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. नवनियुक्त आळंदी शहर मंडळ अध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांचा उत्साहात सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संकेत वाघमारे यांनी केले.