खडकी पोलिसांचे ऑपरेशन “मूनलाईट” यशस्वी
ऑपरेशन "मूनलाइट" – अंधारातून सत्याच्या प्रकाशाकडे......

पुणे. 2025 च्या फेब्रुवारी महिन्यात, पुण्यातील एका मोठ्या सरकारी रुग्णालयात दाखल झालेल्या एका अवघ्या 14 वर्षीय निर्भया (नावात बदल केला आहे) मुलीच्या प्रेग्नंसीची माहिती समोर आल्यानंतर, केवळ तिचे कुटुंबच नव्हे तर वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस यंत्रणाही हादरून गेली होती…
तिच्या डोळ्यातील गोंधळ आणि भय – त्यामागे एक न सांगितलेलं, पण खोलवर जखम करणार सत्य दडलेलं होतं. ती म्हणाली, ” गेमिंग अँप वर गेम खेळत असताना ओळख झाली, मोबाईल नंबर माहित नाही… चेहराही पाहिलेला नाही…त्याने मास्क घातलेला होता.” अशी नकारात्मक माहिती पीडितेने देऊन एक डिजिटल अंधःकारमय सावली निर्माण केली होती…नाव, नंबर, चेहरा उघड नव्हतं..
कोंढवा पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला गेला. पण घटनास्थळाची पाहणी करता खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा घडल्याचे समजल्याने गुन्हा पुढील तपासकामो खडकी पो स्टे ला वर्ग करण्यात आला.
…आता प्रकरणाचं स्वरूप जड आणि गुंतागुंतीचं झालं होतं.
रेखा दिघे, महिला PSI, यानी बऱ्याचदा बलात्काराच्या गुन्ह्याचा तपास करून गुन्हे उकल केले होते, मात्र अशा प्रकारच्या गुन्हे कार्य प्रणालीच्या गुन्ह्याचा तपास त्यांच्यासाठी देखील एक आव्हानच होत.
CDR, SDR, IPDR – तांत्रिक तपासही निष्फळ ठरला होता. गेम कंपनीकडून देखील काहीच उपयुक्त माहिती मिळाली नाही…
चार महिन्यांपर्यंत तपास करून देखील काहीच प्रगती नसल्याने तपास ठप्प झाला… फिर्याद सहकार्य करत नसल्याने इतर माहिती नाही.
घटना जुनी व झोपडपट्टीतील असल्याने सी.सी.टि.व्ही. फुटेज देखील उपलब्ध नव्हते…
वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल गेला – “आरोपी ओळख पटू शकलेली नाही.”
या गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त मा. हिम्मत जाधव यांनी स्पष्ट निर्देश दिले – “हा गुन्हा उघडकीस आणायचाच.”
याच टप्प्यावर तपासाचं नेतृत्व पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले यांच्याकडे आलं – आणि तपासाला एक निर्णायक वळण मिळालं. तपासाची सूत्रे चौगले आणि त्यांची विशेष पथक (सुधाकर राठोड, गालीब मुल्ला, शशांक डोंगरे, अनिकेत भोसले, दिनेश भोई, प्रताप केदारी, रुषीकेश दिघे) यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.
या पथकाने केवळ पारंपरिक तपासाची वाट न धरता, परिस्थितीची गुंतागुंत समजून घेत कल्पकतेच्या आणि धाडसाच्या बळावर तपास पुढे नेला.
*जाळं – आणि सत्य*
खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली, PSI चौगले यांनी आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने अचूकतेचा आणि संयमाचा सर्जिकल सापळा रचला.
तपासाचा पुढचा टप्पा अतिशय किचकट आणि धोकाधायक होता. मुलगी व तिचे नातेवाईक कोणतीही सहकार्य करत नव्हते. आता या सगळ्यांच्या मदतीशिवाय व पीडित मुलीची नाव बाहेर न येता तिची ओळख न पटता तपास करावयाचा होता. आरोपी कुठल्याही तांत्रिक पुराव्यांपासून दूर होता… त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
त्यामुळे तपास पथक यांनी वेशांतर करुन काही माहिती मिळेल का या आशेवर वेषांतर करुन गोपणीय माहिती प्राप्त करण्याचे ठरविले.
मुलगी राहत असलेला एरिया मुस्लिम वस्तीने गजबजलेला असेल्याने PSI चौगले, सुधाकर राठोड, यांनी मुस्लिम वेश धारण केला. नावं ठेवलं – सुलतान मिर्झा आणि इकबाल खान. सोबत पोलीस अमलदार गालीब मुल्ला. पीडीता राहते त्या परिसरात कधी शोरमा विक्रेते, तर कधी फिरते फळ विक्रेते म्हणून पोलीस उपस्थित राहू लागले. संवाद अडू नये म्हणून मुस्लिम धर्मीय पोलीस अमलदार गालीब मुल्ला हा पुढाकार घ्यायचा…
शशांक डोंगर याने पीडितेच्या मैत्रिणीशी मैत्री करून तिच्याकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. तर प्रताप केदारी आणि रुषीकेष दिघे यांनी गोपणीय पध्दतीने नातेवाईक यांची माहिती काढून त्याचेंसोबत गोपनीय संपर्क केला.
टेक्निकल माहिती अनिकेत भोसले यांनी संकलित केली या सर्व तपासातून एक माहिती समोर आली – दाखल गुन्ह्याती पीडीता हि मुलगी अद्यापही एका व्यक्तीला भेटण्यासाठी गुपचूप बाहेर पडते.
*जाळं–आणि सत्य*
खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली, एक सर्जिकल अचूकतेचा सापळा तयार झाला. त्या दिवशी, पोलिसांची टीम वेगवेगळ्या वेशात – वडापाव विक्रेते, रस्त्यावरील विक्रेते, दुकानात काम करणारे – या भूमिकांमध्ये सज्ज होती
प्राप्त माहिती प्रमाणे मुलगी घरातून निघाली. तिच्या चेहऱ्यावरचा भीतीचा भाव स्पष्ट होता. ती एका विशिष्ट गल्लीकडे चालली होती… आणि एक सावध असलेला इसम तिच्या समोर आला. पोलीस हालचालींचा अंदाज घेताच आरोपी पळू लागला. पोलीसांनी अतिशय शिताफिने ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशीत तो–”ना तो राहुल होता, ना तो दिल्लीचा होता, गेमच्या माध्यमातून अनोळखीही नव्हता – तो तर परिसरातीलच होता. पीडितेच्या ओळखीचा, तिच्या भोळेपणाचा, आणि तिच्या वयाच्या अज्ञानाचा फायदा घेणारा. आरोपीत नामे फर्दीन करमत खान वय 20 वर्षे रा. कोंढवा पुणे असे असुन मुळचा राहणारा कोंडवा पुणे येथीलच आहे.
यावरुन पीडीत मुलीला पोलीस ठाणेस आणुन महिला दक्षता कमिटी पुढे पुन्हा विश्वासात घेवून विचारले असता तिने भीती पोटी नाव सांगितले नसल्याचे सांगितले त्यानुसार तिचा पुरवणी जबाब घेवून वरील इसमास दाखल गुन्ह्यात अटक करुन पुढील तपास मा. वपोनि खडकी दिलीप फुलपगारे सर करत आहेत..
______________
एक शेवट, आणि एक सुरुवात
“गुन्ह्याचा तपास” फक्त आरोपीच्या अटकेने संपलं नाही. त्यानं अनेक गोष्टी अधोरेखित केल्या:
• डिजिटल माध्यमातून होणारे गुन्हे हे केवळ ऑनलाईन नसतात – ते ऑफलाईन जखमा देतात.
• भय आणि सामाजिक दबावाने किती मुलं-मुली गप्प राहतात, आणि त्यांच्या मनातली ती कुबडी – ती ओळखणं हेच पोलिसांचं खऱ्या अर्थाने काम आहे.
• संवेदनशीलता, तंत्रज्ञान आणि दृढनिश्चय यांच्या साह्याने सर्वात गुंतागुंतीचा गुन्हा सुद्धा उलगडता येतो.
______________
ऑपरेशन मूनलाइट हा तपास नव्हता, तो एक संघर्ष होता – एका मुलीच्या अबोलतेतून सत्य बाहेर आणण्याचा.
तो विश्वास होता – पोलिसांचा त्यांच्या जबाबदारीवर.
आणि तो विजय होता – अंधारात गेलेल्या एका गुप्त सत्यावर, ज्याने अखेर उजेड पाहिला.