जॉय एन क्रू तर्फे नॉर्दर्न लाईट्स च्या पर्यटनाची संधी

पुणे, प्रतिनिधि – प्रकृतीच्या अद्भुत आणि भुरळ घालणाऱ्या चमत्कारांपैकी एक म्हणजे नॉर्दर्न लाईट्स (Aurora Borealis). या अद्वितीय दृश्याचा आनंद घेण्याची संधी आता जॉय एन क्रू या भारतातील प्रीमियम ट्रॅव्हल ब्रँड तर्फे पर्यटकांना उपलब्ध झाली आहे. उबदार ग्लास इग्लू मध्ये झोपण्याचा अनुभव, स्नोमोबाईल आणि रेनडिअर स्लेज वरून ऑरोराचा पाहणे, तसेच बर्फाळ समुद्रात आइसब्रेकर क्रूझ ही प्रवासाची वैशिष्ट्ये आहेत. जॉय एन क्रू सोबत ही स्वप्नवत आर्क्टिक सफरची टूर केवळ पाहण्याचीच नाही, तर जगण्याची एक अविस्मरणीय अनुभूती ठरणार आहे. ही संपूर्ण यात्रा आराम, लक्झरी आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाने परिपूर्ण असून नॉर्वे, फिनलंड आणि आइसलँड या स्कँडिनेव्हियन देशांमध्ये जॉय एन क्रू कडून गट प्रवास तसेच व्यक्तिगत प्रवास यांचे पर्याय दिले जातात. प्रत्येक टूर ही फक्त पर्यटन न राहता, एक आयुष्यभराची आठवण बनावी असा उद्देश या ब्रँडचा असतो.
“Your Joy, Our Crew” हे ब्रँडचे ब्रीदवाक्य असून त्यानुसार प्रत्येक ग्राहकासाठी व्हिसा सहाय्यता, उबदार थर्मल गिअर, तात्काळ मदत आणि स्थानिक सांस्कृतिक अनुभवांची आखणी अगदी काटेकोरपणे केली जाते. याशिवाय, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष गट टूर उपलब्ध असून त्यात आरामदायक वेळापत्रक, अधिक सुविधा आणि आपुलकीने बांधलेले वातावरण यावर भर दिला जातो. प्रवास नव्याने करणारे असोत किंवा अनुभवी ट्रॅव्हलर जॉय एन क्रू तर्फे ची ही नॉर्दर्न लाईट्स टूर म्हणजे एक संपूर्ण सजीव अनुभव आहे, ज्यामध्ये आनंद, शांतता आणि विस्मय यांचा मिलाफ आहे.