मराठी

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समिती पुणे च्या वतीने तीव्र आंदोलन

- १५ ऑगस्ट रोजी आंबेडकरी समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड मोठे आंदोलन करण्याचा निर्धार

Spread the love

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरणासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केवळ आश्वासनांवर बोळवण केल्याने आंबेडकरी चळवळीतील नेते आक्रमक

पुणे :  मंगळवार पेठ येथील ससून हॉस्पिटल समोरील जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तार करावा, त्या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक निर्माण करावे अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्षीय  नेत्यांची आहे.  राज्याच्या आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात या विषयावर डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समिती पुणे च्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच १५ ऑगस्ट रोजी पुणे जिल्हाधिकारी कचेरीवर आंबेडकरी जनतेच्या वतीने प्रचंड जवाब दो  आंदोलन करण्याचा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारिकरण कृती समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत सोमवारी देण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनालगत मंगळवार पेठेतील सर्व्हे नंबर ४०५ मधील जागा विस्तारीकरणासाठी देण्याचा निर्णय २० जुलै २००० साला मध्ये पुणे महापालिकेच्या स्थायी समिती व मुख्य सभेने ठराव बहुमताने मंजूर केला होता. मात्र, ४ सप्टेंबर २०२४ पासून एन. जी. व्हेंचर्सला ६० वर्षांच्या भाडेकरारावर ही जागा देण्याचा बेकायदेशीर करार केला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एखादा ठराव सर्वानुमते मंजूर झाल्यास त्याची तात्काळ अंमलबजावणी होण्या ऐवजी नियम धाब्यावर बसवून कायद्याची पायमल्ली करत घाईगडबडीने हा भूखंड खाजगी कंपनीला देण्याचा निर्णय घेतला. पक्ष व राजकारण बाजूला ठेवून आंबेडकरी जनतेच्या अस्मितेचा विषय असलेली ही जागा खासगी कंपनीला देऊ नये, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केलेली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणासाठी आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र आहेत. या भवनाचे विस्तारीकरण करण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख  यांनी दिले होते. तदनंतर 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब यांनी देखील ही जागा डॉ. आंबेडकर स्मारकासाठी देण्याचा आदेश काढला होता. त्यामुळे महापालिकेने २००० साला मध्ये केलेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करून येथे आंबेडकर भवनाचा विस्तार व स्मारकाचे काम त्वरित सुरु करावे. महापालिकेच्या वतीने आंबेडकरी विचारांचे प्रचार व प्रसार केंद्र, संशोधन केंद्र, स्पर्धा परीक्षा केंद्र, अभ्यासिका यासह डॉ. आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारावे, जेणेकरून आंबेडकरी समाजाला न्याय मिळेल, अशी भावना नेत्यांनी व्यक्त केली.

या संदर्भात समितीने हा प्रश्न शासनाकडे मांडण्यासाठी सर्व प्रथम पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा केली,  त्यानंतर त्यांनी समितीची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणली..यावेळी फडणवीस यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करण्यात येऊन त्यांना संपूर्ण विषय सांगितला होता त्यावेळी त्यांनी बाबासाहेबांच्या  स्मारकासाठी आपण सकारात्मक आहोत, मात्र काही  निर्णय यापूर्वी झाले असल्यामुळे त्यातील तांत्रिक बाजू पाहून सकारात्मक निर्णय घेऊ  असे त्यांनी कळवले होते. त्या अनुषंगाने  उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.  सदर निवेदनाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेमध्ये  मुख्यमंत्र्यांनी सदर स्मारकाच्या जागेबाबत आपण सकारात्मक असून शासनाच्या वतीने शक्य तितक्या लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले होते, तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा सदरील जागा आंबेडकर सांस्कृतिक भवन साठी देण्यास हरकत नसल्याचे समितीला सांगितले होते. मात्र
मा. मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी तसा प्रस्ताव कॅबिनेट मध्ये अद्याप मांडला नाही यामुळे आंबेडकरी नेते नाराजी व्यक्त करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button