ब्रेकिंग न्यूज़मनोरंजनमराठी

येत्या रविवारी ‘कृष्णा : म्युझिक, ब्लिस अँड बियॉन्ड’ या संगीतमय कार्यक्रम

बँकर ते सुप्रसिद्ध गायक – अमेय डबली यांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी

Spread the love

पुणे. सध्या महाराष्ट्रात आणि देशभरात प्रसिद्ध गायक अमेय डबली यांच्या ‘कृष्णा : म्युझिक, ब्लिस अँड बियॉन्ड’ या संगीतमय कार्यक्रमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. संगीत, भक्ती आणि अध्यात्म यांचा सुरेल संगम असलेला हा कार्यक्रम केवळ एक कॉन्सर्ट नसून भगवान श्रीकृष्णाच्या जीवनशैली, तत्त्वज्ञान आणि शिकवणींवर आधारित एक आत्मिक प्रवास आहे. या कार्यक्रमात प्रेक्षकांना भक्तिगीत, गाथा आणि श्रीकृष्णाचे विविध पैलू – कलाकार, तत्त्वज्ञ, योद्धा आणि मार्गदर्शक या रूपांतून अनुभवायला मिळतो. या कार्यक्रमाच्या नेतृत्वात असलेले अमेय डबली हे एक बहुमुखी कलाकार असून त्यांनी जगभरात ४,००० पेक्षा अधिक मैफिलींमधून रसिकांची मनं जिंकली आहेत. त्यांना ए. आर. रहमान, उस्ताद झाकीर हुसेन, शान आणि पं. राकेश चौरासिया यांसारख्या संगीत क्षेत्रातील दिग्गजांसोबत एकाच मंचावर सादरीकरण करण्याचा मानही मिळाला आहे. येत्या रविवारी २० जुलै रोजी संध्याकाळी ७:३० वाजता, बंटारा भवन येथे अमेय डबली यांचा ‘कृष्णा : म्युझिक, ब्लिस अँड बियॉन्ड’ संगीतमय कार्यक्रम पार पडणार आहे. Ekam Satt Foundation या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

अमेय डबली यांच्या प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांनी त्यांच्या आईकडून म्हणजेच डॉ. अनुराधा डबली (पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या) यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले. पुढे जाऊन त्यांना संगीताची गोडी लागली पण जीवनात कलेबरोबर शिक्षण महत्तवाचं असते. त्यामुळे त्यांनी त्याच उच्चशिक्षण घेत केमिकल इंजिनिअर आणि MBA या क्षेत्रात पदवी पूर्ण केली. शिक्षण पूर्ण झाल्या नंतर त्यांना बँकेत नोकरी मिळाली. नोकरी करत असताना मन मात्र संगीत क्षेत्रात गुंतलेलं होत. त्यांना त्यांची कला स्वस्थ बसून देत नव्हती. त्यामुळे त्यांनी बँकेतील नोकरी सोडून संगीत क्षेत्रात आपलं स्थान निर्माण करण्याचं मनाशी पक्क केलं. या काळात त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना सपोर्ट केला. या १५ वर्षांच्या काळात बऱ्याच कठीण प्रसंगांचा सामना करत आज अमेय डबली सुप्रसिद्ध गायक म्हणून सर्वत्र ओळखले जातात.

सध्या ते तरुणांना संगीत आणि मेडिटेशनच्या कार्यशाळांद्वारे मानसिक आरोग्यावर मार्गदर्शन करतात. कॉर्पोरेट नेतृत्वाच्या प्रशिक्षणासाठी सुद्धा ते त्यांच्या खास शैलीत वर्कशॉप्स घेतात आणि अनेक आघाडीच्या संस्थांना प्रेरणा देतात. ते एक प्रख्यात लाईफ कोच आणि ट्रेनर सुद्धा आहेत.गेल्या ९ वर्षांत त्यांनी १७५ हून अधिक मैफिली आणि मानसिक आरोग्य कार्यशाळा सशस्त्र दलासाठी घेतल्या असून, फक्त २०२२-२३ या आर्थिक वर्षात ६७ कार्यक्रम ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत सादर करण्यात आले. हे सर्व कार्यक्रम Ekam Satt Foundation या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून घडतात. या संस्थेचे मार्गदर्शन आणि सहकार्य अमेय स्वतः करतात. बहुरंगी व्यक्तिमत्व असलेले अमेय हे एक बहुपरंगी गायक आहेत. ते भक्तीगीत, हिंदी चित्रपटसंगीत, गझल, सूफी, लोकसंगीत आणि इंग्रजी सॉफ्ट रॉक अशा विविध शैलीत सहजपणे गातात. येत्या २० जुलै रोजी संध्याकाळी ७:३० वाजता, बंटारा भवन, सर्वे नं. १०४/पार्ट, पुणे येथे ‘कृष्णा : म्युझिक, ब्लिस अँड बियॉन्ड’ या संगीतमय कार्यक्रम पार पडणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!