मुलांच्या योग्य जडणघडणीसाठी दोन्ही पालकांचे सहकार्य अपेक्षित : माधुरीताई सहस्रबुद्धे
MIT च्या सरस्वती प्राथमिक विद्या मंदिरातील माता पालकांसाठी मुख्याध्यापिका नीलम वाघ यांनी माधुरीताई सहस्रबुद्धे यांचे व्याख्यान आयोजित

MIT च्या सरस्वती प्राथमिक विद्या मंदिरातील माता पालकांसाठी मुख्याध्यापिका नीलम वाघ यांनी माधुरीताई सहस्रबुद्धे यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
शाळेतील सखी सावित्री मंचाच्या सदस्य महिलांनी यावेळी उपस्थिती लावली.
मुलांच्या योग्य जडणघडणीसाठी दोन्ही पालकांचे सहकार्य अपेक्षित असते. पालकसभांमध्ये प्रामुख्याने मुले केंद्रस्थानी ठेवून बोलले जाते. परंतू आज ह्या मंचावर मी महिलांच्या मानसिक सक्षमीकरणावर बोलणार असल्याचे माधुरीताईंनी सुरूवातीलाच स्पष्ट केले.
एक महिला म्हणून आपण पुरूषांपेक्षा कमी आहोत अशी कमीपणाची भावना प्रथम मनातून काढून टाका. असे आवाहन त्यांनी माता पालकांना केले.
दिवसभर महिला आपल्या कुटुंबासाठी कष्ट करीत असतात. त्या धावपळीत स्वतःकडे दुर्लक्ष होते. त्यासाठी आपले शरीर तंदुरुस्त ठेवा.
दिवसाकाठी आपल्याला आनंद देईल अशी एक गोष्ट तरी सातत्याने करा. त्यामुळे ताण निघून जाईल व मन प्रसन्न होईल. मी स्वतः रोज तुळशीवृंदावनापुढे रांगोळी काढून हा आनंद मिळवते. ही प्रसन्नता पुढे दिवसभर टिकते. असे माधुरीताईंनी सांगितले.
‘माझी सून रात्रभर नेटफ्लिक्स पहात बसते आणि सकाळी मुलांचा डबा करायला उठत नाही. माझी सून भरमसाठ ऑनलाईन शॉपिंग करते. तिचा स्वतःवर कंट्रोल रहात नाही.
टी. व्ही. वरच्या सीरिअल्स पाहण्यात गुंग झाल्याने घरात स्वयंपाक वेळेत होत नाहीव. अशा तक्रारी मला सासवा सांगतात.
वायफळ गोष्टींच्या मागे लागून जबाबदारीच्या गोष्टी टाळून नका.
मनोरंजन ही फुरसतीच्या वेळात, मर्यादित काळासाठी करायची गोष्ट आहे हे लक्षात ठेवा. असे त्यांनी माता पालकांना सांगितले.
आपली स्वप्रतिमा आपल्याला लहानपणापासून भोवतालच्या मंडळींकडून वेळोवेळी मिळालेल्या Negative Stokes ने खालावते.
आपल्या मुलांबाबत असे घडता कामा नये याची दक्षता घ्या. मुलांना आजपासून जास्तीत जास्त Positive Stokes देण्याचा संकल्प करूनच इथून घरी जा. असे प्रतिपादन माधुरी ताईंनी केले.
‘ज्याची स्वप्रतिमा जितकी चांगली/ वास्तववादी तितकी ती व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊ शकते, भरीव कामगिरी करू शकते.’ असे प्रतिपादन माधुरी सहस्रबुद्धे यांनी केले.
रोजच्या व्यवहारातील अनेक उदाहरणांची जोड आपल्या भाषणाला देत ताईंनी आपले भाषण रंजक ही केले.
मुख्याध्यापिका नीलम वाघ यांनी आभारप्रदर्शन केले. माधुरीताईंच्या सहकारी मंजिरी पेठे व तृप्ती कुलकर्णी कार्यक्रमाला उपस्थित होत्या.