धर्मब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

१२ हजार ७५० विद्यार्थ्यांना ‘अंकनाद – गणित सात्मीकरण प्रणाली’

टिळक पुण्यतिथी निमित्त गणित प्रणाली प्रदान

Spread the love

पुणे : गणिताची भीती दूर करून विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण करणाऱ्या ‘अंकनाद – गणित सात्मीकरण प्रणाली’ ८७ शाळांमधील एकूण १२,७५० विद्यार्थ्यांना देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ आज पुण्यातील भावे हायस्कूल (सदाशिव पेठ) येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पार पडला.इंडिविश वेलफेअर फाऊंडेशन (मुंबई) यांच्या पुढाकारातून आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. (पुणे) यांच्या तांत्रिक सहकार्याने तयार झालेल्या या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबा शिंदे, मॅप एपिकचे संचालक मंदार नामजोशी, पराग गाडगीळ, इंडिविश वेलफेअर फाऊंडेशनचे संचालक भूपेंद्र मुजुमदार, अतुल कुलकर्णी,संजय पांडे,शशांक टिपणीस यांच्या उपस्थितीत झाले.या उपक्रमात शिक्षण प्रसारक मंडळी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांच्यातील शाळांनी सहभाग घेतला आहे.

या प्रणाली अंतर्गत, शालेय स्तरावर गणितातील पाढे, अपूर्णांक, वर्ग इत्यादी संकल्पना विद्यार्थ्यांना संगीतबद्ध पद्धतीने शिकवण्यात येणार आहेत. एकूण २५५ वर्गांमध्ये प्रत्येकी ५० विद्यार्थ्यांमागे एक अशा पद्धतीने एमपी-थ्री ( MP3) डिव्हाइस वितरित करण्यात येत आहे. या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना गणिताशी मैत्री करता येईल आणि विषयावरील भीती दूर होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.कार्यक्रमात बोलताना बाबा शिंदे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.ते म्हणाले ‘गणिताचा पाया भक्कम झाल्याने शिक्षणाचा आणि प्रगतीचा पाया भक्कम होईल’.मंदार नामजोशी म्हणाले, ‘९० टक्के विद्यार्थ्यांमध्ये गणिताची भीती असते, ती दूर करणारे हे उपकरण केवळ अध्यापनाचे साधन नाही, तर एक संधी आहे विद्यार्थ्यांच्या उजव्या मेंदूला उद्दीपित करण्याची. या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जाईल’.

‘अंकनाद’ ही प्रणाली तीन टप्प्यात विभागलेली असून, पहिल्या टप्प्यात एमपी-थ्री MP3 डिव्हाइसद्वारे श्रवणसंस्कार, दुसऱ्या टप्प्यात मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने ‘पाढे सात्मीकरण स्पर्धा’ आणि तिसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना ‘गणीतालय’ पोर्टलचे सभासदत्व मिळणार आहे. या पोर्टलवर १२०० हून अधिक व्हिडिओ, १००० हून अधिक तज्ज्ञ मार्गदर्शक, आणि गणिताशी संबंधित वेबिनार उपलब्ध आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!