स्वामिनी ग्रुपच्या आकर्षक प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन!

स्वामिनी ग्रुप, पुणे यांच्या वतीने राखी पौर्णिमेनिमित्त आयोजित डिझायनर साडी, ड्रेस मटेरियल, विविध प्रकारच्या ज्वेलरी, डेकोरेटिव्ह बॅग्ज आणि गृहउपयोगी वस्तूंच्या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन नगरसेवक प्रवीण चोरबेले आणि पुणे शहर पोलीस विभागाचे अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील व लतिका सांखला,शितल बियाणी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
स्वामिनी ग्रुप हे पुणे शहरातील महिलांसाठी एक सक्षम व्यासपीठ आहे. या प्रदर्शनामध्ये सुमारे १५० स्टॉल उपलब्ध होते वर्षभरात एकूण अकरा उपक्रमांचे आयोजन करणाऱ्या या ग्रुपमार्फत महिलांना स्वयंपाक, विमा पॉलिसीविषयी जागरूकता अशा विविध उपक्रमांत सहभागी होण्याची संधी दिली जाते. महिलांच्या सशक्तीकरणासाठी काम करणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याप्रसंगी नगरसेविका मनीषा चोरबेले, सुजाता शेट्टी, मोनिका पाटील, जयश्री चव्हाण, दीप्ती शहा, मधुरी जैन, शिल्पा शहा, आकांक्षा शर्मा, जागृती सोनी, भूमिका सोनी व स्वामिनी ग्रुप मंडळांच्या अध्यक्षा नीता मेहता,सरस्वती मेहता,कल्पना मरोथी यांच्यासह अनेक मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते