स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व पॅथॉलॉजी तपासणीत 50% सूट
कोथरूड येथील श्री सरस्वती कराड हॉस्पिटलचा अभिनव उपक्रम

पुणे, १२ ऑगस्ट : “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” या तत्त्वाचे पालन करणारे कोथरूड येथील श्री सरस्वती कराड हॉस्पिटल ने सर्व पॅथॉलॉजी तपासणी मध्ये ५०% सूट देण्याची घोषणा केली आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ही सूट दि. १ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सर्वांसाठी असणार आहे. गरजूंनी या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.
ही सवलत सोमवार ते शनिवार सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत उपलब्ध असेल. गर्दी व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी, पूर्व नोंदणीची सोय उपलब्ध आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.
श्री सरस्वती कराड हॉस्पिटलच्या वतीने ही सूट पॅथॉलॉजी तपासण्या, सी टी स्कॅन, एम आर आय, सोनोग्राफी, मॅमोग्राफी, एक्स रे या तपासण्यांवर असेल. रुग्णांनी नोंदणी व अधिक माहितीसाठी 020 69059000 वर संपर्क साधावा.