मराठी
Your blog category
-
मोशी येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन
पुणे, दि. ९ : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या २५० मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह पिंपरी-चिंचवड…
Read More » -
इंद्रायणी नदी स्वच्छ, सुंदर , प्रदूषण मुक्त करणार :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आळंदी भक्त निवासासाठी २५ कोटी जाहीर ; ज्ञानभूमी प्रकल्पास सर्वोतोपरी सहकार्य आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : राज्यातील वारकरी संप्रदाय…
Read More » -
हौशी छायाचित्रकार रमेश करमरकर यांच्या वैविध्यपूर्ण छायाचित्रांचे १४ पासून प्रदर्शन
पुणे: ज्येष्ठ हौशी, मनस्वी छायाचित्रकार रमेश करमरकर यांच्या वैविध्यपूर्ण आणि पारितोषिक प्राप्त छायाचित्रांचे प्रदर्शन पुणेकरांना पाहण्याची पर्वणी आहे. येत्या १४…
Read More » -
‘क्षण’ आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन रविवारपासून (दि.११)
पुणे : निसर्ग सौंदर्य, विविध ऋतू, ऐतिहासिक ठिकाणे आणि सण उत्सवांचे प्रतिबिंब छायाचित्रांच्या माध्यमातून उमटवणा-या जगभरातील छायाचित्रकारांना व्यासपीठ मिळवून देणारे…
Read More » -
पाकिस्तानच्या अंताची आता सुरुवात, भारतात इथं हल्ला करून केली चूक!..- शशिकांत पाटोळे
पंजाब : पाकिस्तानी सैन्याने एकाच वेळी भारताच्या वेगळ्या ठिकाणी अचानक ड्रोन हल्ला केला आहे. सीमारेषेजवळ भ्याड हल्ले केले आहे. सीमारेषेजवळ…
Read More » -
आळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील माऊली मंदिरात मोहिनी एकादशी धार्मिक परंपरेने पवमान अभिषेख, नित्यउपचार पूजाविधा, महानैवेद्य, धुपारती आदी धार्मिक…
Read More » -
डिशटीव्ही वॉचोने OTT कंटेंटमध्ये केला नवा बदल – ‘FLIQS’ देणार कंटेंट क्रिएटर्सना नवी संधी
पुणे . डिश टीव्ही इंडिया लिमिटेडने डिजिटल कंटेंटच्या क्षेत्रात एक महत्त्वाचं पाऊल उचलत ‘WATCHO’ अॅपमध्ये ‘FLIQS’ (फ्लिक्स ) हा खास…
Read More » -
कॉस्ट अकाउंटंट्स संस्थेच्या पुणे विभागाचा हीरक महोत्सव पुण्यात
पुणे . द इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडिया या देशातील अग्रगण्य संस्थेच्या पुणे विभागाच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण होत…
Read More » -
जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्चा इयत्ता १२ वी चा निकाल १०० टक्के
पुणे . न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्च्या जाधवर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्यू. कॉलेज, पॅराडाईज जू. कॉलेज आणि शार्दुल…
Read More » -
बासरीप्रमाणे भारतीय शास्त्रीय संगीताच्या रियाजामुळे विद्यार्थ्यांचा बुद्धी विकास शक्य: पंडित रोणू मजुमदार
पद्मश्री पंडित रोणू मजुमदार यांच्या बासरीवादनाने उपस्थित मंत्रमुग्ध पुणे. “गुरु केवळ शैक्षणिक ज्ञान देत नाही, तर आयुष्याला दिशा देण्याचे काम करत असतो. आपल्यातील सर्वोत्तम गुण हेरून विद्यार्थ्यांना घडवण्याचे सामर्थ्य गुरुकडे असते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे स्थान अलौकिक आहे. आपण समर्पित भावनेने काम करत राहावे, तसेच विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक गॅजेटस् पासून दूर राहून छंद जोपासावेत. बासरीप्रमाणे भारतीय शास्त्रीय संगीताच्या रियाजामुळे विद्यार्थ्यांचा बुद्धी विकास सहज शक्य होऊन सर्वांगीण विकास साधला जाऊ शकेल,” असे मत ज्येष्ठ बासरीवादक पद्मश्री पंडित रोणू मजुमदार यांनी व्यक्त केले. भारतीय संगीत ही अध्यात्माची वाट आहे. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुजुमदार बोलत होते. संगीत आणि गुरुकुल परंपरा यांचा संगम म्हणजे आपल्या संस्कृतीचे वैभव आहे, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे पंडित रोणू मजुमदार यांना ‘सूर्यदत्त सूर्यभूषण पुरस्कार‘ प्रदान करण्यात आला. शिक्षण, कला, समाजसेवा आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. गायिका आनंदी रोणू मजुमदार, शास्त्रीय गायिका सानिया पाटणकर आणि प्रसिद्ध आर्किटेक्ट सुजाता कोडग यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय स्त्रीशक्ती पुरस्कार‘ देण्यात आला. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया व सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रंगमंचीय कला महत्वाच्या भूमिका निभावतात. नाटक, नृत्य, गायन आणि अभिनय यांसारख्या कलांमुळे केवळ सर्जनशीलता वाढत नाही, तर नेतृत्वगुण, संवाद कौशल्य आणि निर्णयक्षमता सुधारते. रंगमंच हा शिक्षणाचा एक अविभाज्य भाग असायला हवा. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर कलाक्षेत्रातही प्रगती करावी, याकरिता सूर्यदत्तमध्ये कला, तसेच सर्वच क्षेत्रातील दिग्गजांना, युवा कलाकारांना निमंत्रित केले जाते. त्यांच्याशी संवादाचे आयोजन केले जाते. मोबाइल, टीव्हीपासून अंतर ठेवत उच्च शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी छंद जोपासावेत आणि परिपूर्ण विकास घडवावा, यासाठी सूर्यदत्त सदैव प्रयोगशील राहील.” पंडित मजुमदार यांनी बासरीवादन करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सानिया पाटणकर यांनी आपल्या बहारदार आवाजात ‘हे सुरानो चंद्र व्हा‘ नाट्यपद आणि संस्कृत गणेश वंदना सादर केली. रोणू व आनंदी या मुजुमदार दाम्पत्याने भक्तीरचना सादर केली. सानिया पाटणकर, आर्कि. सुजाता कोडग यांनीही व्यवसायातील विविध पैलूंवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले. नरेंद्र कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल, संचालक प्रशांत पितालिया यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. ——————– २७८७: पद्मश्री पंडित रोणू मजुमदार यांना ‘सूर्यदत्त सूर्यभूषण पुरस्कार’ प्रदान…
Read More »