मराठी

Your blog category

  • चाकणमधील वीजपुरवठा सक्षम करण्यासाठी महावितरणकडून तातडीच्या उपाययोजना

    पुणे, दि. २३ ऑगस्ट २०२६ : चाकण औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांना अखंडित व विश्वासार्ह वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणने वीज यंत्रणा सक्षम करण्याच्या उपाययोजनांना गती दिली आहे. महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी शनिवारी (दि. २२) चाकण एमआयडीसी परिसरातील वीजपुरवठा यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी करुन आढावा घेतला. तसेच ३३/२२ केव्ही भांबोली आणि ह्युंदाई उपकेंद्रांमध्ये प्रत्येकी १० एमव्हीए क्षमतेची रोहित्रे कार्यान्वित केली. या अतिरिक्त रोहित्रांमुळे चाकण औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. ह्युंदाई येथील केंद्र यापूर्वी केवळ स्विचिंग स्टेशन म्हणून कार्यरत होते. वाढत्या औद्योगिक वीजभाराचा विचार करून त्याचे ३३/२२ केव्ही उपकेंद्रात रूपांतर करण्यासाठी मुख्य अभियंत्यांनी पाठपुरावा केला. त्यास संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी तातडीने मंजुरी दिली. त्यानुसार ह्युंदाई येथील केंद्राचे ३३/२२ केव्ही उपकेंद्रात रूपांतर करून ते कार्यान्वित करण्यात आले. त्याचबरोबर ३३/२२ केव्ही भांबोली उपकेंद्रात अतिरिक्त १० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र कार्यान्वित करण्यात आले आहे. चाकण औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने होत असलेला विस्तार आणि भविष्यातील वाढती विजेची मागणी लक्षात घेऊन महावितरण व महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने कामे गतीने पूर्ण करावीत. भविष्यातील वीज मागणीचे अचूक नियोजन करून औद्योगिक ग्राहकांना विश्वासार्ह व दर्जेदार वीजपुरवठा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश धनंजय औंढेकर यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले. यावेळी महावितरण व महापारेषणचे वरिष्ठ अभियंते उपस्थित होते. महापारेषणच्या अतिउच्चदाब यंत्रणेचीही पाहणी महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर यांनी महापारेषण कंपनीच्या ४०० केव्ही चाकण, २२० केव्ही ब्रिजस्टोन आणि २२० केव्ही चाकण फेज-२ या अतिउच्चदाब उपकेंद्रांचीही पाहणी करून आगामी काळातील वीजपुरवठा नियोजनाचा आढावा घेतला. २२० केव्ही ब्रिजस्टोन उपकेंद्रात ५० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र नुकतेच कार्यान्वित करण्यात आले आहे.  तसेच, ४०० केव्ही चाकण उपकेंद्रात २२ केव्हीचे चार अतिरिक्त ‘फिडर बे’ उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती महापारेषणच्या अभियंत्यांनी दिली. तर २२० केव्ही चाकण फेज-२ उपकेंद्रात अतिरिक्त १०० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र बसविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या उपाययोजनांमुळे चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या वीज मागणीची पूर्तता करण्यासाठी महावितरण व महापारेषणची यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे.

    Read More »
  • संसदीय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेत विद्यार्थ्यांनी साकारली अभिरूप संसद

    पुणे : सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या भूमिका, विधेयकांवरील चर्चा, प्रश्नोत्तरांचा तास आणि विविध विषयांवरील वादविवाद अशा संसदीय वातावरणात जाधवर विधी…

    Read More »
  • एमकेसीएलचा रौप्यमहोत्सव पूर्ती सोहळा उत्साहात

    बुद्धिमान महाराष्ट्र घडविण्यासाठी सरकार पावले उचलेल :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :महाराष्ट्रातील युवा पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्ञान, कौशल्य आणि रोजगाराच्या…

    Read More »
  • दिशा परिवारतर्फे २५० विद्यार्थांना शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान सोहळा

    पुणे: दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गरजू व गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. यंदा कार्यक्रमाचे २०…

    Read More »
  • श्री महालक्ष्मी मंदिरात पुणेकरांनी रंगविल्या लाडक्या गणरायाच्या मूर्ती

    पुणे : पारंपरिक पद्धतीने शाडूच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीला रंग देणे, कोरड्या रंगांचा वापर करणे आणि मूर्तीवरील वस्त्रावर सिल्क इफेक्ट करणे अशा…

    Read More »
  • पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे अतिउत्कृष्ट सेवा पदक मिळाल्याबद्दल विविध पक्षातील मान्यवरांच्या हस्ते सत्कार

    पुणे:  पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना त्यांच्या उल्लेखनीय आणि कर्तव्यदक्ष सेवेबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मानाचे अति उत्कृष्ट सेवा…

    Read More »
  • परिस्थिती कोणतीही असो, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत _सहपोलीस आयुक्त संजय दराडे

    पुणे : मी देखील पहिली ते चौथीपर्यंत महापालिकेच्या शाळेतून शिक्षण घेतले असून, आज तुमच्या शहराचा सहपोलीस आयुक्त म्हणून उभा आहे.…

    Read More »
  • पुण्यात गॅसची उपलब्धता, नेटवर्कची क्षमता आणि CNG वितरण क्षमता वाढवण्यासाठी MNGL कडून CNG पायाभूत सुविधांच्या विस्ताराला वेग — बहु-टप्प्यांचा कार्यक्रम

    पुणे, 16 ऑगस्ट 2026: महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) ने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील CNG पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी व्यापक…

    Read More »
  • महेश सूर्यवंशी यांच्या कार्याचा पुणे महापालिकेतर्फे सन्मान

    पुणे : गणेशोत्सव तसेच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, जलसंवर्धन आणि धार्मिक क्षेत्रात चार दशकांहून अधिक काळ उत्तुंग कार्य करणारे श्रीमंत दगडूशेठ…

    Read More »
  • पशुसंवर्धन आयुक्तालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

    पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे-67 : भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण…

    Read More »
Back to top button
error: Content is protected !!