ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

७७ व्या भारतीय संविधान दिनानिमित्त बार्टी व समाज कल्याण विभागातर्फे भिडे वाड्यापासून संविधान दिंडी

संविधानाच्या प्रियांबलचे वाचन करून दिंडीला प्रारंभ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर समारोप

Spread the love

पुणे : ७७ व्या भारतीय संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व समाज कल्याण विभाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी सकाळी महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांची भारतातील मुलींची पहिली शाळा असलेल्या भिडे वाडा, बुधवार पेठ, पुणे येथून संविधान दिंडी काढण्यात आली.

सर्वप्रथम विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाच्या प्रतिमेस पुण्यनगरीचे उपमहापौर मा. परशुराम वाडेकर व बार्टीच्या आयुक्त यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यानंतर संविधान दिंडीला झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले. संविधानाच्या प्रियांबलचे (सरनाम्याचे) सामूहिक वाचन करून या दिंडीला सुरुवात करण्यात आली.

यावेळी समाज कल्याण आयुक्त तथा बार्टीच्या प्रभारी महासंचालक मा. दीपा मुधोळ-मुंडे, सहायक आयुक्त समाज कल्याण मा. विशाल लोंढे, बार्टीच्या निबंधक मा. डॉ. सुचिता शिंदे, विभागप्रमुख मा. बबन जोगदंड, लेखाधिकारी यांच्यासह बार्टी व समाज कल्याण विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

या दिंडीत शहरातील अनेक शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच शहरातील आंबेडकरी चळवळीतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“भारतीय संविधानाचा विजय असो”, “जय भीम, जय संविधान” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी दिंडीत उत्साहात सहभाग घेतला. भिडे वाडा येथून निघालेली ही संविधान दिंडी शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचली. तेथे पुतळ्यास अभिवादन करून दिंडीचा समारोप करण्यात आला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!