मराठी

कोथरूडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त “मार्कंडेय हवन”

Spread the love

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे कोथरूडमध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. **17 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता मृत्युंजयेश्वर मंदिरात “मार्कंडेय हवन”** पार पडणार आहे.

मोदी यांच्या दीर्घायुष्य व आरोग्यसंपन्नतेसाठी हे हवन करण्यात येणार असून सकाळी 10 वाजता त्याची पूर्णाहुती होईल. नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे संयोजन **विश्वजित देशपांडे (उपाध्यक्ष, उद्योग आघाडी, महाराष्ट्र प्रदेश), संदीप खर्डेकर (प्रवक्ता, भाजपा महाराष्ट्र प्रदेश) आणि सौ. मंजुश्री खर्डेकर (मा. नगरसेविका, शिक्षण समिती अध्यक्ष, पुणे मनपा)** यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!