ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर
रोटरी क्लब सिनर्जीच्या वतीने तळजाई टेकडीवर कापडी पिशवी वाटप.

पुणे .नागरिक खरेदीसाठी अनेकदा प्लास्टिक पिशवी वापरतात, त्याने पर्यावरणास नुकसान होते. प्रत्येकाने जवळ कापडी पिशवी वापरली तर ही हानी टाळता येते. या अनुषंगाने रोटरी क्लब सिनर्जीच्या वतीने तळजाई टेकडीवर फिरण्यास तसेच तेथील वस्तू खरेदी करण्यास आलेल्या नागरिकांना ३५० कापडी पिशव्यांचे वाटप केले. या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब सिनर्जीचे अध्यक्ष गिरीधर खानचंदनी, अर्चना शिंगवी, अमित शाह, प्रिया शहा, संतोष रांदड, स्वप्नाली कल्याणी, प्रणोती, व शांतनू पवार आदी मान्यवर उपस्थित होते.



