ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यामुळे २५ वर्षापासून रखडलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी

एकलव्य कॅालेज जवळील मिसिंग लिंकचे लोकार्पण

Spread the love

पुणे. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे २५ वर्षांपासून प्रदीर्घ काळ रखडलेला मिसिंग लिंकचा प्रश्न मार्गी लागला असून, एकलव्य कॅालेज पासून राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या मिसिंग लिंकचे आज लोकार्पण झाले. यापूर्वी एरंडवणे रजपूत वीटभट्टी येथून नदीपात्राच जाणाऱ्या मिसिंग लिंकचे ना. पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे रुंदीकरण होऊन आता हा मार्ग वाहतुकीसाठी सुलभ झाला आहे.

कोथरुड मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मतदारसंघातील मिसिंग लिंक पूर्ण करण्याचा ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी संकल्प केला होता. यासाठी महापालिका आयुक्तांसोबत वारंवार बैठका घेऊन; यातील अडथळे दूर करण्याच्या सूचना आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

 

यापैकी एकलव्य कॅालेज ते राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या मिसिंग लिंकसाठी जमीन अधिग्रहण ही मोठी अडचण होती. ही मिसिंग लिंक पूर्ण करण्यासाठी संबंधित जमीन मालकासोबत महापालिका अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका होऊनही त्यात यश येत नव्हते. त्यामुळे ना. पाटील यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून जागा मालकास भेटून त्याच्या सर्व शंकाचे निरसन करुन महापालिकेची जमीन हस्तांतरित करुन दिली. तसेच, महापालिकेला ही जलदगतीने रस्ता पूर्ण करण्याच्या सूचना ही दिल्या.

त्यानुसार, सदर रस्त्याचे काम पूर्ण झाले असून आज त्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना ना. पाटील म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी कोथरुड मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मिसिंग लिंकचा प्रश्न मार्गी लागणे प्रकर्षाने जाणवत होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर सदर विषयात लक्ष घालून पाठपुरावा करत होतो. यामध्ये जमीन अधिग्रहण हा मुख्य मुद्दा असल्याचे लक्षात आले. त्यामुळे संबंधित जागा मालकांशी वारंवार संवाद करुन रस्त्याची आवश्यकता ही पटवून दिली. त्यामध्ये एकलव्य कॅालेज ते महामार्गाला जोडणाऱ्या मिसिंग लिंकसाठी बांदल कुटुंबियांनी ही सहकार्य केले. त्यामुळे सदर मार्ग तयार होऊन वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मतदारसंघातील इतरही मार्ग लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या लोकार्पण प्रसंगी महापालिकेच्या पथ विभागाचे अनिरुद्ध पावसकर, जागा मालक बांदल कुटुंबीय, माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, दिलीप वेडे पाटील, माजी नगरसेविका डॉ. श्रद्धा प्रभूणे-पाठक, अल्पना वरपे, भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश वरपे, जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. संदीप बुटाला, विद्या टेमकर, गिरीश भेलके, वैभव मुरकुटे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!