बाल्यावस्थेतील कर्करोगाच्या मदतीसाठी धर्मादाय संगीत मैफिल
कॅनकिड्स किड्सकॅन या भारतातील बाल्यावस्थेत होणाऱ्या कर्करोगासाठी सर्वात मोठ्या

स्वयंसेवी संस्थेचा पुढाकार
पुणे, 11नोव्हेंबर, 2025: मुंबईत संध्याकाळच्या वेळेस दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आलेल्या आयोजनात कॅनकिड्स किड्सकॅन, ही भारतातील सर्वात मोठी बाल्यावस्थेतील कर्करोगासाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था आणि बांसुरी म्युझिक ग्रुप (म्युझिक विथ अ मिशन) यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोगग्रस्त बालकांसाठीच्या महाकेअर्स फॉर किड्स विथ कॅन्सरकरिता निधी गोळा करण्यासाठी “सुनेहरे स्वर- बन जायेंगे गोल्ड” हा कार्यक्रम सादर करण्यात आला. बालपणातील कर्करोग जागृतीचे जागतिक प्रतीक असलेल्या सोन्यापासून प्रेरित असलेल्या कॅनकिड्सच्या देशव्यापी ‘बन जायेंगे गोल्ड’ मोहिमेचा हा एक भाग आहे. या धर्मादाय मैफिलीने धैर्य, करुणा आणि कर्करोगाशी धैर्याने लढणाऱ्या मुलांच्या भावनेचा उत्सव साजरा केला.
संगीत, आरोग्यसेवा, मानव कल्याण आणि सार्वजनिक जीवनातील डॉ. संजय मुखर्जी (महानगर आयुक्त-एमएमआरडीए), श्री. रणजीत देओल (प्रधान सचिव-शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग), डॉ. श्रीपाद बाणावली (संचालक शैक्षणिक टाटा मेमोरियल सेंटर आणि प्राध्यापक वैद्यकीय आणि बालरोग ऑन्कोलॉजी विभाग), डॉ. पूर्णा कुरकुरे (प्रमुख बालरोग ऑन्कोलॉजी एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल) आणि इतर अनेक, मुंबईतील काही उत्कृष्ट गायक जसे की डॉ. राहुल जोशी, राजेश अय्यर आणि संगीता मळेकर यांनी लता मंगेशकर, किशोर कुमार, आशा भोसले आणि आर. डी. बर्मन यांच्यासारख्या दिग्गजांचे कालातीत बॉलीवूड क्लासिक सादर केले. या सांगीतिक मेजवानीच्या रूपाने आशेचा संदेश पोहोचविण्यास मदत झाली.
प्रेक्षकांना संबोधित करताना, पूनम बागई संस्थापिका अध्यक्षा, कॅनकिड्स म्हणाल्या, “जेव्हा संगीत ध्येय साध्य करते, तेव्हा अंतःकरणे एकत्र येतात आणि आशेला पंख फुटतात. कॅनकिड्स 2010 पासून महाराष्ट्रात काम करत असून 2012 मध्ये कर्करोगग्रस्त बालकांसाठी पहिली विशेष शाळा एमसीजीएम सोबत सार्वजनिक-खासगी भागीदारीत सुरू केली आणि 2019 मध्ये महाराष्ट्र सरकारशी (एमईडीडी आणि एनएचएम) 2 राज्य आरोग्य सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. आमच्या ‘चेंज फॉर चाइल्डहुड कॅन्सर इन महाराष्ट्र’ या प्रकल्पाच्या माध्यमातून कॅनकिड्सने कर्करोगबाधित बालके आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रवेश, आर्थिक संरक्षण आणि अस्तित्वाला चालना दिली आहे. आम्ही दोन मोठ्या उपक्रमांसाठी सुमारे 3.5 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा विचार करीत आहोत. त्यापैकी 1.5 कोटी टीएमएच मुंबई येथे 1,000 मुलांना अत्यावश्यक आपत्कालीन वैद्यकीय सहाय्य पुरवण्यासाठी आणि 2 कोटी रुपये नागपूर, औरंगाबाद आणि पुणे (कोल्हापूर-सांगलीसह) येथील प्रादेशिक बाल कर्करोग विभागांना बळकट करण्यासाठी आहेत.”
एमएमआरडीएचे सध्याचे महानगर आयुक्त असलेले संजय मुखर्जी (आयएएस) कॅनकिड्सविषयी बोलताना म्हणाले, “माझा कॅनकिड्ससोबतचा परिचय 2019 पासून आहे. तेव्हापासून आतापर्यंत बाल्यावस्थेतील कर्करोगासाठी जागरूकता आणि बदल घडवून आणण्याच्या दिशेने एकत्रितपणे केलेली प्रगती पाहणे माझ्यासाठी थक्क करणारे ठरले. संगीत, आनंद आणि जागृतीच्या या स्वरमयी संध्याकाळचा भाग होण्यासाठी मी उत्सुक आहे. आज राज्यात कर्करोग असलेल्या अंदाजे 73% मुलांची काळजी घेतली जात आहे आणि सर्वांच्या मदतीने आपण एकत्रितपणे 100% चे लक्ष्य गाठू.”
डॉ. बाणावली (संचालक शैक्षणिक टीएमएच आणि प्राध्यापक वैद्यकीय आणि बालरोग ऑन्कोलॉजी) म्हणाले, “बाल्यावस्थेतील कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. परंतु वैद्यकीय उपचार आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीबरोबरच शिक्षण, निवास, समुपदेशन, पोषण यासाठी सहाय्य आवश्यक आहे. जे कॅनकिड्स सारख्या संस्था महाराष्ट्रात बाल्यावस्थेतील कर्करोगासाठी बदल घडवून आणण्यासाठी उपलब्ध करून देतात.”
रणजीत देओल (आयएएस) म्हणाले, “मला हे पाहून आनंद होत आहे की कॅनकिड्स त्यांच्या CanshalaforLife आणि इतर शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे कर्करोगग्रस्त बालकांच्या शिक्षणाच्या अधिकाराला पाठिंबा देत आहे. यामुळे ते दीर्घकाळ उपचार घेत असताना शाळा सोडणार नाहीत याची खात्री होते. महाराष्ट्रातील या कार्यक्रमांशी संबंधित सर्व बाबींमध्ये कॅनकिड्सला पाठिंबा आणि सहभाग देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.”
कर्करोगाशी झुंज देत असलेल्या मुलांसोबत प्रेक्षक गात-नाचत असताना प्रेम, आपुलकी आणि भावनेचे हृदयस्पर्शी अनुभव घेत ही संध्याकाळ संपन्न झाली. या कार्यक्रम कर्करोगग्रस्त आणि त्यांच्या कुटुंबासाठी आश्वासक ठरला कारण यावेळी “कॅन्सर को ढिशूम ढिशूम! बन जायेंगे गोल्ड” हे वचन मिळाले.



