पुण्याच्या विकास आराखड्यातील रस्ते पूर्ण झाल्याशिवाय वाहतूक कोंडीचा सुटणार नाही- ना. पाटील
सुतारवाडी बस डेपोच्या २४ मीटर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
कोथरुड मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, मतदारसंघातील सुतारवाडी मधील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. ना. पाटील यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आज झाले. विकास आराखड्यातील रस्ते पूर्ण झाल्याशिवाय पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नाही, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कोथरुड मतदारसंघातील मिसिंग लिंकचा प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही भूमिका असून, यासाठी सातत्याने महापालिकेत पाठपुरावा सुरु होता. ना. पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे रजपूत वीटभट्टी परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण, एकलव्य महाविद्यालयापासून राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या मिसिंग लिंकचे काम पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण झाले आहे.
सुतारवाडी सुतारवाडी बस डेपो (सर्वे नं. १२४) येथील २४ मीटर रस्त्याच्या कामातील अडथळे दूर झाले असून, रस्ता रुंदीकरणासाठी पाच गुंठे जागेची आवश्यक्ता होती. यासाठी संबंधित जागा मालकांकडून जमीन हस्तांतरणाचे काम पूर्ण झाले आहे. सदर हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या कामाचे भूमिपूजन ना. पाटील यांच्या उपस्थितीत स्थानिक नागरिकांच्या हस्ते झाले. या कामांमुळे मुख्य महामार्गाकडून सुतारवाडी-सुस रोड शिवमंदिर चौक जाणाऱ्या नागरिकांची मोठी सोय झाली आहे. तसेच, जमीन अधिग्रहणामुळे समान पाणीपुरवठ्याच्या कामाला गती मिळून ते काम ही पूर्ण झाले आहे. त्यामुळे या परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.
यावेळी बोलताना ना. पाटील यांनी सर्व जागा मालकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, बाणेर बालेवाडी भाग विकसित होत असताना अनेक भागांचा महापालिकेशी जोडली गेली. या भागाच्या विकासासाठी नागरि सुविधा सुलभ होण्यासाठी अनेक विकास कामांची अवश्यक्ता असते. यामध्ये रस्ते विकास हा मोठा भाग असून, दोन भाग जोडण्यासाठी मिसिंग लिंक दुवा ठरतो. सुतारवाडीतील सुस गाव- सुतारवाडी शिव मंदिराला जोडणारा सर्व्हे नंबर १२४ चा भाग हा अतिशय महत्वाचा होता. ह्या रस्त्याच्या विकासामुळे सुतारवाडी-पाषाण-सुस गाव मधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ते पुढे म्हणाले की, पुणे शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी विकास आराखड्यातील रस्ते पूर्ण होणे आवश्यक आहे. समृद्धी महामार्गाला पाच पट मोबदला दिला. हा महामार्ग झाल्याने दळणवळण अतिशय सुलभ आणि गतिमान झाले आहे. त्यामुळे शासन अतिशय संवेदनशीलतेने आणि नागरी सुविधांसाठी काम करत असल्याने अनेक विकास कामे मार्गी लागत आहेत. सुतारवाडीतील रस्त्यासाठी स्थानिक नागरिकांनी ही सहकार्य केल्याने हा मार्ग सुकर होईल, अशी भावना यावेळी व्यक्त केली.
या भूमिपूजन कार्यक्रमावेळी सर्व सुतार कुटुंबीय, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, भाजप उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, आबा सुतार, शिवम सुतार, सचिन सुतार, राहुल कोकाटे, रोहन कोकाटे, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, मोरेश्वर बालवडकर, सुभाष भोळ, सचिन दळवी, अनिकेत चांधेरे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



