भीमा कोरेगाव विजयस्तंभ शोर्यदिन नियोजनात 40 टक्के वाढ करावी : राहुल डंबाळे
शौर्यदिन कार्यक्रमासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करावी
पुणे: १ जानेवारी रोजी होणाऱ्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या देशभरातील अनुयायांना देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये 40 टक्क्यांची वाढ करावी अशी आग्रही मागणी भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी आज केली आहे.
येरवडा येथील सामाजिक न्याय भावनांमध्ये हवेली प्रांताधिकारी यशंवत माने यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय समिती व आयोजक कार्यकर्ते व संघटना प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये राहुल डंबाळे यांनी वरील मागणी केली तसेच राज्य सरकारने 2026 च्या शौर्यदिन कार्यक्रमासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करावी अशी तेखिललमागणी केली आहे.
दरम्यान मागील वर्षी पेक्षा या वर्षी शौचालय , पिण्याचे पाणी , बसेस व पार्किंग व्यवस्था इत्यादींसाठीच्या सुविधांविषयी सुमारे 40 टक्क्यांची वाढ करावी अशी मागणी करण्यात आली होती यास अधिकाऱ्यांनी सकारात्मकत प्रतिसाद दिला आहे.
विजयस्तंभ राष्ट्रीय स्मारकाचा आराखडा प्रत्यक्ष अंमलबजावणीस येण्यापूर्वी तातडीची बाब म्हणून विजयस्तंभास या ठिकाणी भेट देणाऱ्या अन्यायांना वर्षभर पायाभूत सुविधा द्याव्यात अशी देखील मागणी यावेळी करण्यात आलीत.



