आळंदी नगरपरिषदेत चार उमेदवारी अर्ज दाखल

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या ४ थ्या दिवशी तीन उमेदवारांनी चार नामनिर्देशनपत्रे दाखल केले आहेत. नगराध्यक्षपदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रकाश पंढरीनाथ कुऱ्हाडे यांचेसह ४ अर्ज दाखल झाले आहेत.
नगरपरिषद निवडणुकीसाठी १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. नगराध्यक्ष आणि सदस्य पद या साठी एकूण चार अर्ज दाखल झाले आहेत.
नगराध्यक्षपदा साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून प्रकाश कुऱ्हाडे यांनी उमेदवारी अर्ज दिला आहे. अपक्ष राजाराम चौधरी यांनी अर्ज दिला आहे. सदस्य पदास प्रभाग क्रमांक ५ मधून रोहन कुऱ्हाडे यांनी एक अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर तर दुसरा अपक्ष उमेदवार म्हणून दाखल केला आहे.



