ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

बाल दिनानिमित्त “विशेष मुलांनी” लुटला विविध खेळांचा आनंद !!

ग्लोबल ग्रुप व क्रिएटिव्ह फाउंडेशन चा उपक्रम - मुलांसाठी क्रीडा व कला साहित्य भेट !!

Spread the love

बाल दिना निमित्ताने पुणे मनपाच्या शिवाजीनगर येथील 14 ब ह्या विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ग्लोबल ग्रुप आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आमच्या मुलांना समाजकार्यांची आवड निर्माण व्हावी व त्यांनी समाजातील वंचित घटकां प्रती चे आपले कर्तव्य बजावावे ह्या हेतूने आम्ही त्यांना अश्या उपक्रमांसाठी प्रेरित करतो असे ग्लोबल ग्रुप चे संचालक मनोज हिंगोरानी व संजीव अरोरा म्हणाले.
नवीन पिढीमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी व आपल्याकडे जे जास्तीचे आहे ते दुर्लक्षित आणि वंचित घटकांना देण्याची सवय लागावी यासाठीच क्रिएटिव्ह फाउंडेशन प्रयत्नशील असल्याचे फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.
रिद्धी हिंगोरानी, भाविका हिंगोरानी, निकिता अरोरा,ग्लोबल ग्रुप च्या एच आर च्या उपाध्यक्ष जयश्री राव, त्यांच्या टीम चे सदस्य अल्तमश इनामदार,रेखा भोसले यांनी विशेष मुलांसोबत संगीत खुर्ची,पासिंग बॉल, बाऊची व इतर खेळ खेळून त्यांना प्रोत्साहित केले. दिव्यांग असूनही मुलांनी सर्व खेळ अत्यंत रंजक पद्धतीने खेळून पारितोषिकं पटकावली.
विशेष मुलांनी कसरतींचे, प्रार्थनेचे व राष्ट्रगीताचे प्रात्यक्षिक ही सादर केले. तसेच उत्साहाने भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी आणि वंदे मातरम च्या घोषणा ही दिल्या.
ह्या मुलांसोबत वेळ घालविणे हा आमच्या साठी खूप सुखद क्षण होता व यापुढे राष्ट्रीय दिवस, सण, वाढदिवस व इतर प्रसंगी अश्या विविध शाळांमध्ये जाऊन कार्यक्रम व मदत करण्याचा मानस असल्याचे रिद्धी हिंगोरानी,भाविका हिंगोरानी, निकिता अरोरा यांनी स्पष्ट केले. मुलांनी दिलेले प्रेम बघून ह्या युवतींच्या डोळ्यात अश्रू तरंगले.

 


ग्लोबल ग्रुप तर्फे या प्रकारचे उपक्रम आयोजित करताना मनस्वी आनंद होत असल्याचे जयश्री राव म्हणाल्या.
हा माझ्यासाठी भावनिक क्षण असून केवळ भेटवस्तू किंवा निधी ची मदत न करता ह्या मुलांसोबत वेळ घालविणे महत्त्वाचे असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.

यावेळी विशेष मुलांसाठी फुटबॉल,कॅरम बोर्ड, बॅडमिंटन सेट,रिंग, आर्ट क्राफ्ट बुक,रंगकाम बुक,चित्रकला वही,कलर,ब्रश
एक रेघी दोन रेघी चार रेघी व चौकोनी वह्या पेन्सिल खोडरबर सेट,व्हॅलीबॉल व इतर साहित्य भेट देण्यात आले.
मुलांसोबत खाऊ खाताना खऱ्या अर्थाने “बालदिन” साजरा केल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होते.
सदर शाळा प्राथमिक शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका विशेष मुलांची शाळा मनपा क्र.१४ बी शिवाजीनगर गावठाण पुणे.च्या मुख्याध्यापक सौ.वर्षा संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी विशेष मुलांची शाळा असून याप्रसंगी
शिक्षक निलेश बाबासाहेब मिरगणे, शिक्षिका प्रियांका राजानंद मोरे,सेवक माऊली श्रीराम सुरत,सेविका बेबी मधूकर बोरकर,सेविका गौरी कांबळे,सुरक्षा रक्षक स्वामी शिवशरण या सर्वांनी उत्तम नियोजन व सहकार्य केल्याबद्दल क्रिएटिव्ह फाउंडेशन व ग्लोबल ग्रूप तर्फे त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!