आळंदीत नरसिंह सरस्वती सद्गुरु देवांचा वार्षिकोत्सवाचे आयोजन
२८ डिसेंबर ते २१ जानेवारी या कालावधीत धार्मिक पर्वणी

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान मठ आळंदी यांचे वतीने नरसिंह सरस्वती सद्गुरु देवांचा वर्षोकोत्सव २०२५ चे आयोजन २८ डिसेंबर ते २१ जानेवारी या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनातून करण्यात आले आहे. श्रींचे वार्षिकोत्सवात परंपरेने आळंदीतील क्षेत्रोपाध्ये माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी, माजी नगरसेवक सुधीर गांधी आणि गांधी परिवार तर्फे परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांचे पूजा, अभिषेख पौरोहित्य सेवा अनेक वर्षां पासून रुजू होत आहे.
या निमित्त श्रींचे संजीवन समाधी मंदिरात २८ डिसेंबरला कोठी पूजन परंपरेने करून उत्सवास सुरुवात होणार आहे. २ जानेवारी श्रींचा रथोत्सव, ३ जानेवारी श्रींचा महोत्सव आणि मुक्त द्वार अन्न संतर्पण दिन साजरा होणार आहे. या निमित्त भाविकांना मुक्त अन्नदान महाप्रसाद वाटप श्री विठ्ठल, श्री विठ्ठल हरिनाम गजरात होणार आहे. ४ जानेवारी रोजी दिंडी मिरवणूक काला व रात्री श्रींची पालखी मिरवणूक प्रथा परंपरांचे पालन करीत होईल. ७ जानेवारी रोजी श्रींची प्रक्षाळ पूजा होत असून या निमित्त भाविकांना श्रींचे संजीवन समाधीवर जलाभिषेक करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.

श्रींचे वार्षिक उत्सवामध्ये वैकुंठ वाशी परमपूज्य श्री माधव महाराज गोडबोले यांची पुण्यतिथी २१ जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या निमित्त भाविक, नागरिक, वारकरी यांनी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मठ येथे होत असलेल्या धार्मिक पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान विश्वस्त मंडळ यांचे वतीने करण्यात आले आहे.
वर्षिकोत्सवात वासुदेव महाराज बोरसे यांचे सुश्राव्य किर्तन तसेच उत्सवात विविध मान्यवरांची प्रवचने देखील होणार आहेत. उत्सवात दैनंदिन कार्यक्रमात अखंड नामस्मरण उपक्रम परंपरेने राबविण्यात येत आहे. यासाठी भाविकांनी आपले नाव नोंदणी करावी तसेच श्री गुरुचरित्राचे रोज सप्ताह पद्धतीत वाचन, कोठे पूजन पासून पौर्णिमे पर्यंत सुरू राहणार आहे. या साठी भाविक वारकरी, आळंदी ग्रामस्थ यांनी आपापली नावे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.
श्रींचे रथोत्सव दिनी रात्री पौर्णिमेस अष्टपदीचे श्री जय देवकृत गायन दीपक रुद्र महाड मठाधिपती श्री पद्मनाभ स्वामी महाराज संस्थान धुळे यांच्या तर्फे होणार आहे. कोठी पूजन दिनी ह. भ. प. अवधूत महाराज चक्रांकित बुवा यांच्या हस्ते उत्सवा तील अखंड विणा उभी केली जाणार आहे. विणा पूजन तसेच श्रींचे पालखी सोहळ्या दिनी ह. भ. प. अवधूत महाराज चक्रांकित यांचे काल्याचे किर्तन होत आहे. अशी माहिती संस्थान तर्फे जाहीर करण्यात आली आहे. वार्षिकोत्सवातील विविध कार्यक्रमांसह श्रींचे दर्शनास भाविक नागरिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. आळंदीतील श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज संस्थान विश्वस्त मंडळ वार्षिकोत्सवाचे यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. श्रींचे संजीवन समाधी मंदिरात वार्षिक उत्सवाची तयारी सुरु झाली आहे.



