२८ डिसेंबर ते २१ जानेवारी या कालावधीत धार्मिक पर्वणी
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान मठ आळंदी यांचे वतीने नरसिंह सरस्वती सद्गुरु देवांचा वर्षोकोत्सव २०२५ चे आयोजन २८ डिसेंबर ते २१ जानेवारी या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनातून करण्यात आले आहे. श्रींचे वार्षिकोत्सवात परंपरेने आळंदीतील क्षेत्रोपाध्ये माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी, माजी नगरसेवक सुधीर गांधी आणि गांधी परिवार तर्फे परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांचे पूजा, अभिषेख पौरोहित्य सेवा अनेक वर्षां पासून रुजू होत आहे.
या निमित्त श्रींचे संजीवन समाधी मंदिरात २८ डिसेंबरला कोठी पूजन परंपरेने करून उत्सवास सुरुवात होणार आहे. २ जानेवारी श्रींचा रथोत्सव, ३ जानेवारी श्रींचा महोत्सव आणि मुक्त द्वार अन्न संतर्पण दिन साजरा होणार आहे. या निमित्त भाविकांना मुक्त अन्नदान महाप्रसाद वाटप श्री विठ्ठल, श्री विठ्ठल हरिनाम गजरात होणार आहे. ४ जानेवारी रोजी दिंडी मिरवणूक काला व रात्री श्रींची पालखी मिरवणूक प्रथा परंपरांचे पालन करीत होईल. ७ जानेवारी रोजी श्रींची प्रक्षाळ पूजा होत असून या निमित्त भाविकांना श्रींचे संजीवन समाधीवर जलाभिषेक करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.


