स्वामी विवेकानंद विचारमंच च्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन
8 ते 12 जानेवारी दरम्यान आयोजन
पुणे : स्वामी विवेकानंद विचारमंचाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून येत्या 8 ते 12 जानेवारी दरम्यान व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आले आहे. अण्णाभाऊ साठे सभागृह, बिबवेवाडी, पुणे येथे दररोज सायं ६.३० वा. ही व्याख्यानमाला पार पाडणार आहे. यासाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे.
या व्याख्यानमालेत येत्या गुरुवारी दि. ८ जानेवारीला ब्रिगेडिअर (निवृत्त) हेमंत महाजन यांचे ऑपरेशन सिंदूर या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर दि.9 रोजी मा. सुबुही खान (सुप्रीम कोर्ट लॉयर) यांचे आज का हिंदुत्व या विषयावर व्याख्यान होणार आहे. शनिवार दि. १० रोजी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांचे छ. शिवाजी महाराजांची अष्टसूत्री या विषयावरील व्याख्यान होणार आहे. रविवार दि. ११ जानेवारीला झारखंडच्या हिंदुत्ववादी नेत्या अपर्णा सिंग यांचे हिंदुत्व का पुनरूत्थान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तर सोमवार, दि. १२ जानेवारी रोजी युगप्रवर्तक डॉ . हेगडेवार या नाटकाचे सादरीकरण होणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.


