‘सोलारीस करंडक’ वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय टेनिस स्पर्धा !!
गौरव पटेल, गणेश देवखिले, अन्वित पाठक, गौरव जोशी, संतोष साठे, मंदार मेहेंदळे दुसऱ्या फेरीत !!

पुणे, दि. १९ जानेवारीः सोलारीस क्लब आणि रविंद्र पांड्ये टेनिस ॲकॅडमी (आरपीटीए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाराव्या ‘सोलारीस करंडक’ वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय टेनिस २०२६ स्पर्धेच्या ३५ वर्षावरील गटात गौरव पटेल, गणेश देवखिले, अन्वित पाठक, गौरव जोशी यांच्यासह संतोष साठे आणि मंदार मेहेंदळे यांनी ४५ वर्षावरील गटातमध्ये खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा संघर्षपूर्ण पराभव करून दुसरी फेरी गाठली.
कर्वेनगरमध्ये मयुर कॉलनीमधील सोलारीस क्लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत ३५ वर्षावरील गटात गौरव पटेल याने धनेश गायकवाड याचा टायब्रेकमध्ये ८-७ (५) असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. चुरशीच्या झालेल्या सामन्यात गणेश देवखिले याने देवेंद्र पैलवाल याचा टायब्रेकमध्ये ८-७ (७-०) असा पराभव केला. अन्वित पाठक याने ब्रिजेश सिंग याचा ८-४ असा आणि गौरव जोशी याने शैलादित्य बॅनर्जी याचा ८-४ असा पराभव करून आगेकूच केली. भिष्म देसाई याने नितीन सावंत याचा ८-० असा पराभव केला. जितेंद्र सावंत याने ओराम चौधरी याचा ८-३ असा पराभव करून आगेकूच केली. पुण्याच्या रविंद्र पांड्ये याने आशिष चौहान याचा ८-० असा सहज पराभव करून दुसरी फेरी गाठली. संदीप पवार, सिद्धार्थ जोशी, वैभग अवघडे, धनेश्वर पडाळे, अजिंक्य पाटणकर, केतन गद्रे, अरविंद पांचाल, विशाल साळवी आणि संतोष दळवी यांनीसुद्धा सहज विजय नोंदवून दुसरी फेरी गाठली.
४५ वर्षावरील गटात पुण्याच्या आणि राष्ट्रीय मानांकित खेळाडू नितीन किर्तने याने उदय माने याचा ८-१ असा सहज पराभव केला. चुरशीच्या झालेल्या सामन्यात संतोष साठे याने सुजित परसोडकर याचा टायब्रेकमध्ये ८-७ (१०-८) असा पराभव केला. मंदार मेहंदळे याने विकास अश्विन याचा ८-४ असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकालः मुख्य ड्रॉः पहिली फेरीः ३५ वर्षावरील गटः
भिष्म देसाई वि.वि. नितीन सावंत ८-०; जितेंद्र सावंत वि.वि. ओराम चौधरी ८-३;
गौरव पटेल वि.वि. धनेश गायकवाड ८-७ (५); रविंद्र पांड्ये वि.वि. आशिष चौहान ८-०;
संदीप पवार वि.वि. विकाश शिगवण ८-२; सिद्धार्थ जोशी वि.वि. प्रविण देसाई ८-२;
वैभग अवघडे वि.वि. निनाद वहीकर ८-२; गणेश देवखिले वि.वि. देवेंद्र पैलवाल ८-७ (७-०);
धनेश्वर पडाळे वि.वि. सिद्धार्थ उप्पोनी ८-०; अजिंक्य पाटणकर वि.वि. अमेय श्रीखंडे ८-२;
अन्वित पाठक वि.वि. ब्रिजेश सिंग ८-४; केतन गद्रे वि.वि. नितीन गावसकर ८-२;
गौरव जोशी वि.वि. शैलादित्य बॅनर्जी ८-४; अरविंद पांचाल वि.वि. अतुल गुनाले ८-३;
विशाल साळवी वि.वि. साहीन इंदुलकर ८-०; संतोष दळवी वि.वि. अमोल ढापरे ८-२;
४५ वर्षावरील गटः पहिली फेरीः
नितीन किर्तने वि.वि. उदय माने ८-१; सागर कोसेकर वि.वि. विनायक पटवर्धन ८-२;
परीक्षीत तांचे वि.वि. सुनिल बोरडे ८-४; मंदार मेहंदळे वि.वि. विकास अश्विन ८-४;
रतिश रतुसारीया वि.वि. डॉ. विकास बाहेलु ८-२; संतोष साठे वि.वि. सुजित परसोडकर ८-७ (१०-८);
गिरीश कुकरेजा वि.वि. अमरनाथ सुरेंद्रनाथ ८-२; डॉ. अमित रानाडे वि.वि. अनंत गुप्ता ८-०;
सुनिल लुल्ला वि.वि. विकास चौधरी ८-२; मंदार वाकणकर वि.वि. श्रीराम ओक ८-०;
अरूण कटारीया वि.वि. केदार राजपाठक ८-०; सतिश परांजपे वि.वि. गजेंद्रसिंग चौहान ८-३;
दिपक पाटील वि.वि. राहूल शर्मा ८-१; कृष्णा देवेंद्र वि.वि. संदीप असाटे ८-०;



