‘पुणे क्रिकेट करंडक’ १४ वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धा !!
क्रिक९ ॲकॅडमी, महाराष्ट्र मंडळ क्लब, एके स्पोर्ट्स क्लब, योगेश इलेव्हन, चंद्रन पाणीकर क्रिकेट ॲकॅडमी संघांची विजयी कामगिरी !!

येवलेवाडी येथील ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत श्रेय असलेकर याने फटकावलेल्या २१७ धावांच्या जोरावर क्रिक९ संघाने एसपीजे-प्रविण तांबे क्रिकेट ॲकॅडमीचा १२६ धावांनी सहज मात केली. श्रेय याने ८४ चेंडूत १५ चौकार आणि २२ षटकारांसह २१७ धावांची खेळी साकारली. दुसऱ्या सामन्यात सिद्धांत कोठारी याने केलेल्या १०७ धावांच्या जोरावर महाराष्ट्र मंडळ क्लब संघाने युनिक क्रिकेट ॲकॅडमीचा ११९ धावांनी सहज पराभव केला. सिद्धांत कोठारी याने ५८ चेंडूत १८ चौकार व २ षटकारांसह १०७ धावा केल्या. शर्वण व्हावळ याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर एके स्पोर्ट्स क्लबने क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमीचा ३९ धावांनी सहज पराभव केला. शर्वण याने १३ धावांत चार गडी बाद केले.
हर्षल पवार याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर योगेश इलेव्हनने एपीजे प्रविण तांबे क्रिकेट ॲकॅडमीचा तीन धावांनी निसटता पराभव केला आणि आगेकूच केली. पहिल्यांदा खेळणाऱ्या योगेश इलेव्हनने १०७ धावांचे लक्ष्य उभे केले होते. याला उत्तर देताना एपीजे प्रविण तांबे क्रिकेट ॲकॅडमीचा डाव २४.४ षटकात १०४ धावांवर संपुष्टात आला. संग्राम पाटील याने भेदक गोलंदाजीच्या जोरावर चंद्रन पाणीकर क्रिकेट ॲकॅडमीने सीएसआर संघाचा ६ गडी राखून सहज पराभव केला. संग्राम याने २१ धावांत पाच गडी बाद करताना अफलातून गोलंदाजी केली.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
१) क्रिक ९ ॲकॅडमीः २५ षटकात ७ गडी बाद २६० धावा (श्रेय असलेकर २१७ (८४, १५ चौकार, २२ षटकार), प्रणय गाडेकर २२, विरेन दहाळे २-३२) वि.वि. एसपीजे प्रविण तांबे क्रिकेट ॲकॅडमीः २५ षटकात ७ गडी बाद १३४ धावा (विरेन दहाळे ४२, ऋतुराज पारवे २७, रौनक जोशी २०, शाश्वत सिंग ४-२५, कृष्णा मगर २-१४); सामनावीरः श्रेय असलेकर;
२) महाराष्ट्र मंडळ क्लबः २३ षटकात ४ गडी बाद २५७ धावा (सिद्धांत कोठारी १०७ (५८, १८ चौकार, २ षटकार), आदित्य मोहीते ४७, रूद्र रेडाके २९, इरफान शेख २-३३) वि.वि. युनिक क्रिकेट ॲकॅडमीः २३ षटकात ८ गडी बाद १३८ धावा (शौर्य वाघमारे ४३, ओविस मोमिन १५, स्वराज लिमण २-१२); सामनावीरः सिद्धांत कोठारी;
३) एके स्पोर्ट्स क्लबः २५ षटकात ९ गडी बाद १२९ धावा (आर्यन आव्हाड २१, शौर्य चव्हाण २६, अर्णव रणदिवे ३-१३, मोहम्मद अली २-१८, रोहन यादव २-१८) वि.वि. क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमीः २१.५ षटकात ९ गडी बाद ९० धावा (रोहन यादव नाबाद २१, शर्वण व्हावळ ४-१३, स्वरीत पी. ३-१७, युवराज तेलंगे २-२२); सामनावीरः शर्वण व्हावळ;
४) योगेश इलेव्हनः २१.१ षटकात १० गडी बाद १०७ धावा (प्रद्युम्न कानिटकर २२, श्रेय पाडळकर १२, गणेशा कुमार ३-११, बी.कृष्णा२-१०, ध्रुव कोरेकर २-१५) वि.वि. एपीजे प्रविण तांबे क्रिकेट ॲकॅडमीः २४.४ षटकात १० गडी बाद १०४ धावा (रौनक जोशी १६, ऋतुराज पारवे १५, हर्षल पवार ३-२०, स्वरीत नरूळे २-१८); सामनावीरः हर्षल पवार;
५) सीएसआरः २५ षटकात ९ गडी बाद १५६ धावा (विवान दांगड ४२, विधीत रायकर २६, संग्राम पाटील ५-२१, अवनिश कदम २-१७) पराभूत वि. चंद्रन पाणीकर क्रिकेट ॲकॅडमीः २४.५ षटकात ४ गडी बाद १५९ धावा (आयुष पवार नाबाद ३२, सम्राट झेंडे ३०, अवनिश कदम २३, दर्षन हिरकूर नाबाद २०); सामनावीरः संग्राम पाटील.



